इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसण्याचीशक्यता आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर आहेत. पक्ष प्रवेशाबाबत त्यांची भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबई प्रदेशची आज सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठकशरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेशची आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार असून या बैठकीत महाविकास आघाडी सोबत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडणार आहेत. पक्षाकडून महाविकास आघाडीत लढताना २२ जागांचा प्रस्ताव तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
BJP: पुण्यात महायुतीतील भाजप-शिवसेना नेत्यांची आज बैठकपुण्यात आज महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत काही जागांवर सेनेकडून प्रस्ताव दिला जाणार आहे. 22 तारखेला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. तर शिवसेनेला 25 ते 30 जागा भाजपकडून दिल्या जाण्याची शक्यता आहे.
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांची आज अँजिओग्राफी होण्याची शक्यताअजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांची आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अँजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच कोकाटे यांच्यावर पुढची कारवाई होणार असल्याची माहीती समोर आली आहे.