T20 World Cup 2026: शनिवारी टी 20 वर्ल्ड कपसह न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कोणत्या 15 खेळाडूंना संधी मिळणार?
GH News December 20, 2025 12:12 AM

आयसीसीने अवघ्या काही दिवसांआधी 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं (Icc T20i World Cup 2026) वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार यजमान भारत आणि श्रीलंकेतील 7 शहरांमधील 8 स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सामन्यांचा थरार रंगणार आहे. भारतातील 5 तर श्रीलंकेतील 2 शहरांमधील 3 स्टेडियममध्ये सामने होणार आहेत. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे. सूर्याचा कर्णधार म्हणून हा पहिला वर्ल्ड कप असणार आहे. मात्र सूर्या व्यरिक्त वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात आणखी कुणाला संधी मिळणार? याची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी संपणार आहे.

20 डिसेंबरला टीम इंडियाची घोषणा

टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कपआधी मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची शनिवारी 20 डिसेंबरला घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांची मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. अजित आगरकर या पत्रकार परिषदेतून वर्ल्ड कप आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहेत. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? हे स्पष्ट होणार आहे.

टीम इंडिया-न्यूझीलंड मालिका

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी एकूण 2 मालिकांमध्ये 8 सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात एकदिवसीय मालिकेत 3 तर टी 20i सीरिजमध्ये 5 सामने होणार आहेत. दोन्ही संघांसाठी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी 20i मालिका फार महत्वाची असणार आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 11 जानेवारी वडोदरा

दुसरा सामना, 14 जानेवारी, राजकोट

तिसरा सामना, 18 जानेवारी, इंदूर

उभयसंघात वनडेनंतर 21 ते 31 जानेवारी दरम्यान टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधीची शेवटची मालिका असणार आहे.

टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक

टीम इंडिया-न्यूझीलंड टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 21 जानेवारी, नागपूर

दुसरा सामना, 23 जानेवारी, रायपूर

तिसरा सामना, 25 जानेवारी, गुवाहाटी

चौथा सामना, 28 जानेवारी, वायझॅग

पाचवा सामना, 31 जानेवारी, तिरुवनंतरपुरम

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.