मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई भाजपने आपली २० जणांची निवडणूक समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत केंद्र आणि राज्य स्तरावरील वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. उमेदवारांची निवड, निवडणुकीची रणनीती आणि प्रत्यक्ष समन्वय मजबूत करणे हे काम ही समिती करेल.
भाजप- शिवसेना युतीची शक्यता धुसरआगामी महापालिका निवडणुकीसाठी नवी मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीची शक्यता धुसर दिसत आहे. कारण, अद्यापही स्थानिक नेतृत्वांध्ये कोणत्याही बैठक अथवा चर्चा झालेल्या नाहीत.
Kalyan Live: कल्याणमध्ये मद्यधुंद तरुण-तरुणीचा मध्यरात्री भर रस्त्यात धिंगाणाकल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात मध्यरात्री मद्यधुंद तरुण तरुणींचा धिंगाणा पाहायला मिळाला. याचा व्हीडीआे सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही नागरीकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांसमोरही देखील मद्यधुंद तरुणी शिव्या देत होती. भर रस्त्यात तरुण तरुणींच्या धिंगाण्यामुळे पाेलिस ठोस कारवाई का करीत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Live: कफ सिरप प्रकरणात अटकेला स्थगिती देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळलीकोडीनयुक्त कफ सिरप प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआर आणि अटक रोखण्याला आव्हान देणाऱ्या रिट याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावल्या. राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अचल सचदेवा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
Mumbai Live: मुंबईत अनेक ठिकाणी एनएसजी कमांडो आणि पोलिसांनी केले मॉक ड्रिलऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, एनएसजी कमांडो आणि मुंबई पोलिसांच्या फोर्स वन कमांडोंनी मुंबईतील संवेदनशील भागात आणि ठिकाणी एक मोठी मॉकड्रिल केली. एनएसजी कमांडो आणि मुंबई पोलिसांच्या कमांडोंनी 48 तासांचा मॉकड्रिल केला. विमानतळासह गर्दीच्या ठिकाणीही मॉकड्रिल घेण्यात आले.
Mumbai Live: कोकाटेंना बायपास सर्जरीची गरज- लिलावती रुग्णालयमाणिकराव कोकाटेंच्या व्हेन्समध्ये चार ब्लॉक्स असून त्यांना बायपास सर्जरी करावी लागेल, अशी माहिती लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली.
Pune Live: पानशेत धरणात बुडून तरुणाचा मृत्यूपुणे: पानशेत धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. सद्दाम चाँद व्हसुरे (वय ३०, रा. घुले कॉलनी, नांदेड सिटीजवळ, सिंहगड रस्ता) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. व्हसुरे हा मित्रांसोबत रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे गेला होता. तेथून परतताना गुरुवारी दुपारी तो प्रकाश माळी, अनिल ओव्हाळ व राहुल गायकवाड यांच्यासह पानशेत धरण परिसरात आला. धरणाच्या काठावर बसून चौघांनी काही वेळ विश्रांती घेतली. त्यानंतर सद्दाम पोहण्यासाठी धरणात उतरला. मात्र पोहत असताना तो पाण्यात बुडाला.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूरमंत्री माणिकराव कोकाटे यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. सध्या तरी कोकाटेंची आमदारकी वाचली आहे.
Nashik News: सटाणा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नागरिकांचा आमरण उपोषण इशारासटाणा शहरातून (Satana) जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ व अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. धुळीचे साम्राज्य, मोठमोठे खड्डे, सततची वाहतूक कोंडी आणि अपघातांचा वाढता धोका यामुळे शहरवासीय त्रस्त झाले असून व्यापारी, विद्यार्थी व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण कामामुळे मोठ्या प्रमाणात शहरात वाहतूक कोंडी देखील निर्माण होत आहे. यामुळे सटाणा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम ३० डिसेंबरपर्यंत सुरू न झाल्यास साई सावली फाउंडेशन व शहरातील नागरिकांकडून आमरण उपोषण इशारा दिला आहे.
Jalgaon News: मुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्यांना वाळू माफियांकडून धमकीमुक्ताईनगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करण्यास गेलेल्या तहसीलदारांना वाळू माफियांकडून धमकी देण्यात आली.
अवैध वाळू सह ट्रॅक्टर घेऊन चालक फरार असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तहसीलदार गिरीश वखारे यांचा फिर्याद वरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आला.
फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय करण्यात आले आहे.
Nashik News: नाशिक–संभाजीनगर महामार्गावर उसाचा ट्रॅक्टर पलटी; दीड तास वाहतूक ठप्पनाशिक–संभाजीनगर महामार्गावर निफाड तालुक्यातील नैताळे जवळ आचोळे येथील नदी पुलावर उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या अपघातामुळे गेल्या दीड तासापासून दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Mumbai Nashik Highway Accident: मुंबई नाशिक महामार्गावर बाईक अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यूमुंबई नाशिक महामार्गावर कलमगाव जवळ दोन बाईक अपघातात नवरा बायकोचा मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या सुमारास शहापूर तालुक्यातील कलमगाव जवळ मुंबई नाशिक महामार्गावर दोन बाईकने एकमेकांना समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये कल्याण डोंबिवली येथे राहणारे रोहन लगडे आणि अवंतिका रोहन लगडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
Kolhapur Mahapalika Election Live: महापालिका निवडणूक : महायुतीचे खातेवाटप अजूनही गुलदस्त्यातआगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील महापालिकांमध्ये महायुतीच्या जागावाटपावरून हालचालींना वेग आला आहे. मात्र कोल्हापुरात अद्याप महायुतीत कोणतीही ठोस चर्चा सुरू झालेली नसल्याचं चित्र आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूर महानगरपालिकेत तब्बल २५ जागांची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेकडून आपापली संख्या अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
Pune Live: पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का; माजी नगरसेवक विशाल तांबे यांचा राजकारणातून संन्यासमहापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) साठी मोठा धक्का बसला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय, माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केली. “जरा विसावू या वळणावर” असा भावनिक मजकूर लिहित त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
Santosh Deshmukh Murder Case Live: संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी तात्पुरती स्थगित, दुपारनंतर पुन्हा सुनावणी होणारविशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना बदलावे, कारण ते एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि त्यामुळे केसवर परिणाम होत आहे, असा 3 ते 7 आरोपींचा कोर्टाकडे अर्ज आहे. उज्वल निकम यांनी युक्तिवाद केला की, कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही. आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले काही काळ वैद्यकीय कारणास्तव व्हिसी द्वारे हजर नव्हता, परंतु न्यायालयाने दुसऱ्यांदा पुकारल्यानंतर तो हजर करण्यात आला.
Mumbai Live: “सत्य कधीच लपून राहत नाही” – ड्रग्स प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा घणाघात, आणखी एका मंत्र्याच्या राजीनाम्याचे संकेतउद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारे वक्तव्य केले आहे. “सत्य काही लपून राहत नाही,” असं ठामपणे सांगत त्यांनी ड्रग्स प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
Mumbai Live : मिरा रोड मध्ये भाजपाला मोठा धक्का, भाजप जिल्हा महामंत्री संदीप तिवारी सोडली भाजपाची साथमिरा रोड मध्ये भाजपाला मोठा धक्का
भाजप जिल्हा महामंत्री संदीप तिवारी व अन्य भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सोडली भाजपाची साथ
संदीप तिवारी आणि समर्थक मोठ्या संख्येने मातोश्रीवर पक्ष प्रवेश करण्याकरिता दाखल
Mumbai Live : माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीबद्दल लिलावती रुग्णालयाची चार वाजता पत्रकार परिषदलीलावती रुग्णालयाची पत्रकार परिषद ही चार वाजता होणार...
अचानक वेळेत बदल...
दुपारी दोन वाजता होणारी पत्रकार परिषद ही आता चार वाजता होणार...
तीन वाजता न्यायालयात सुनावणी आणि चार वाजता लिलावतील रुग्णालयाकडून पत्रकार परिषद...
हा योगायोग??
Buldhana Live : बुलढाण्यात मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांची मॉक ड्रिल आणि रूट मार्च...बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीच्या निकाल अनुषंगाने कोणत्याही अनुचित घटना घडू नये, याच अनुषंगाने बुलढाण्यातील कारंजा चौकात बुलढाणा उपविभागीय अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोक ड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आला.. यावेळी नगरपालिका मतमोजणीचे अनुषंगाने पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली आहे.. यामध्ये दंगा काबू पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची रंगीत तालीम सुद्धा घेण्यात आली आहे.. आगामी मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी केले आहे..
Mumbai Live : मीरा रोडमध्ये भाजपाला मोठा धक्काभाजप जिल्हा महामंत्री संदीप तिवारी व अन्य भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलेली भाजपाची साथ
संदीप तिवारी आणि समर्थक मोठ्या संख्येने मातोश्रीवर पक्ष प्रवेश करण्याकरिता दाखल
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणारा पक्षप्रवेश
Nagpur live : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मधील कंपनीत अपघातबुटीबोरी येथील अवाडा कंपनीत निर्माणाधिन टाकी कोसळली
या अपघातात काही कामगार जखमी झाल्याची माहिती
अवाडा ही सोलर पॅनल निर्मितीची कंपनी आहे
नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुटीबोरी येथील नवीन एम आयडिसी परिसरात या कंपनीचे निर्माणाधिन कार्य सुरू आहे
CongressLiveupdate : काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणारमहाविकास आघाडीची पहिली यादी 23 तारखेला जाहीर होऊ शकते. काँग्रेस 80 जागांवर दावा करणार आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वांना समान न्याय देऊ, अशी माहिती अरविंद शिंदे यांनी दिली. मनसेबाबत कोणतीही चर्चा आम्ही केलेली नाही, आमची आघाडी शिवसेना ठाकरेंशी आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्यामुळे भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही, असा निर्धार आघाडीने केला आहे, असे रमेश बागवे यांनी सांगितले. उद्या पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्यावर कुणाला किती जागा मिळतील हे निश्चित होईल.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित. आरोपींचे वकील विकास खाडे, अनंत तिडके, राहुल मुंडे इत्यादी न्यायालयात उपस्थित. सरकारी पक्षाकडून विशेष सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे न्यायालयात उपस्थित. आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला प्रत्यक्षात सुरुवात बीडच्या विशेष मकोका न्यायालयात झाली.
Delhi Live : दिल्ली विमानतळावर आज १५२ उड्डाणे रद्ददिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुक्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. धुक्याचा थेट हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे, परिणामी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयजीआय विमानतळ) येथील १५२ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि अनेक उड्डाणांना विलंब झाला आहे.
Chhatrapati Samabhajinagar Live : वैजापूरमध्ये बिबट्या विहिरीत अडकलावैजापुरातील दाणे वस्ती येथील गट 474 मध्ये गणेश मलिक यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आ ली.शुक्रवारी गणेश मलिक हे शेतपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. वनविभागाला माहिती कळवताच अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पुणे दौऱ्यावरशरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज इच्छुकांच्या मुलाखती
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार
पुणे महापालिका भाजप आणि शिंदे सेना युती मध्ये लढण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार का हे पाहणं महत्त्वाचं
मिरा भाईंदरमध्ये घरात शिरला बिबट्यामिरा भाईंदरमध्ये नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला.
बिबट्याच्या हल्ल्यात तीनही नागरीत गंभीर जखमी झाले.
भाईंदर पुर्वेकडील तलावरोड परिसरातील ही घटना.
Nashik : कोकाटेंच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणीकोकाटेंच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
कोकाटेंच्या विरोधातील याचिकाकर्ते अंजली दिघोळे राठोड आणि आशुतोष राठोड आज उच्च न्यायालयात राहणार उपस्थित
उच्च न्यायालयात देखील कोकाटेंच्या याचिकेला देणार आव्हान
राठोड दांपत्य उच्च न्यायालयात करणार युक्तिवाद
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील निकाल कायम रहावा, यासाठी मांडणार बाजू
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना सुनावलीय दोन वर्षांची शिक्षा
उच्च न्यायालयात देखील न्याय मिळेल, याचिकाकर्ते आशुतोष राठोड
कोकाटेंच्या अटकेचा फार्स करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न, राठोड यांचा आरोप
Manikrao Kokate Live: माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याचा फैसला थोड्याच वेळातमुंबईत माणिकराव कोकाटे यांच्या भवितव्याशी संबंधित घडामोडींचा आज गदारोळ आहे. आज त्यांच्या अँजिओग्राफी टेस्ट थोड्याच वेळात होणार असून, टेस्टच्या अहवालानंतर नाशिक पोलिस पुढील कारवाईवर निर्णय घेतील. त्याचबरोबर, मुंबई हायकोर्टात त्यांनी शिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर देखील थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. आता सर्वांचे लक्ष हायकोर्टच्या निर्णयावर आहे. कोकाटे यांना दिलासा मिळेल की शिक्षा कायम राहील?
Live Update : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीत जागा वाटपाबाबत एकमत नाहीइचलकरंजी महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीत जागा वाटपाबाबत एकमत नाही
मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार प्रकाश आवाडे यांची झाली बैठक
काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा झाला निर्णय
भाजपकडून दिल्या जाणाऱ्या जागांचा ताळमेळ बसत नसल्याने गुंता वाढला
Nagpur Live : नागपूर मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता काटेकोर पाळण्याचे आवाहननागपूर
- नागपूर मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता काटेकोर पाळण्याचे आवाहन.
- मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती.
- निवडणूक आचारसंहितेबाबत राजकीय पक्ष प्रतिनिधींशी बैठक.
- उमेदवारांच्या सोयीसाठी मनपा मुख्यालयात एक खिडकी व्यवस्था सुरू.
- ना हरकत प्रमाणपत्रे आणि परवानग्या झोन कार्यालयातूनच मिळणार.
- प्रत्येक झोनमध्ये निवडणूक अधिकारी नियुक्त.
- उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागणार.
- उमेदवारांसाठी खर्च मर्यादा १५ लाख रुपये.
Mumbai Live : दादर स्टेशनबाहेर थरार, दोन इमारतींमध्ये उड्या मारणाऱ्या व्यक्तीचे दोन तासांपासून रेस्क्यू सुरूदादर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील परिसरात एका व्यक्तीने संशयास्पदरीत्या एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उड्या मारल्याने खळबळ उडाली. सकाळी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गेल्या दोन तासांपासून त्या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, संबंधित व्यक्ती मतिमंद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर असल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना डिस्चार्ज मिळताच अटक होण्याची शक्यता; नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखलमाणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या कोकाटेंना डिस्चार्ज मिळताच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोकाटेंवर वैद्यकीय उपचार सुरू असून लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी चाचणी होणार आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगापुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खोपोली एक्सिटपर्यंत रांगा पोहोचल्या असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महामार्ग पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांकडून ब्लॉक घेण्यास सुरुवात होत आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाकडून राखीव, प्रदेश भाजपची मानहानीची तक्रारबंगळूर : भाजप सरकारवर आरोप करणारी जाहिरात सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी दाखल केलेला मानहानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवरील निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने राखून ठेवला. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील आघाडीच्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचा मजकूर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने मानहानीची खासगी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत बंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. या कारवाईला आव्हान देत राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Chandrakant Patil : महापालिकेसाठी भाजपची आज रणनीती ठरणार; निवडणूकसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेणार कोअर कमिटीची बैठकसांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज, शुक्रवारी (ता. १९) सांगलीत येत असून, त्यांच्या उपस्थितीत भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यात महापालिका निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. मिरजेत होणाऱ्या बैठकीत महायुती म्हणून निवडणूक लढवताना भाजप किती जागा लढविणार, कोणत्या प्रभागांमध्ये जागा घ्यायच्या, याबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Silver Rate : दोन आठवड्यांपासून चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढछत्रपती संभाजीनगर : मागील दोन आठवड्यांपासून चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. घटलेली रुपयाची किंमत आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेने केलेली व्याजदर कपात याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होताना दिसत आहे. मौल्यवान धातूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. चांदीने गुरुवारी सर्वकालीन उच्चांक गाठत एक किलोसाठी दोन लाख १ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार केल्याचे दिसून येते. नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीचे भाव काही प्रमाणात स्थिर होते. मात्र, डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीयस्तरावर होत असलेल्या घडामोडींचा परिणाम वाढत असल्याने देशभरात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे भाव वाढले आहेत.
Belgaum News : मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यूबेळगाव : मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अगसगे येथील शेतकऱ्याचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (ता. १८) मृत्यू झाला. प्रभू बाळाप्पा पट्टी (वय ८२) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतवडीत काम करत असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. सदर घटना बुधवारी (ता. १०) घडली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगे, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. शेतवडीत काम करत असताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारच्या योजनेतून भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यानुसार सदर कुटुंबालाही भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
Kolhapur Politics : महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलासाठी कोल्हापुरात आज प्रमुख नेत्यांची बैठककोल्हापूर : महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलासाठी आज (ता. १९) प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. त्यामध्ये साधारण प्रत्येक पक्षाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा होणार आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. कोल्हापुरातील कोणकोणते प्रभाग आणि उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून द्यायला पाहिजेत. कोणत्या प्रभागातील उमेदवार विजयी होतील. याबाबत शहराध्यक्ष आदिल फरास यांच्यासह प्रमुखांनी मते व्यक्त केली. आज होणाऱ्या महायुतीच्या बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आदिल फरास, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी असतील.
Kolhapur Municipal Corporation Elections : राजकीय पक्षांसोबत प्रशासनाची आज बैठककोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (ता. १९) विविध राजकीय पक्षांची बैठक प्रशासनाने आयोजित केली आहे. मुख्य इमारतीतील स्थायी समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मतदान केंद्र, निवडणूक कार्यालये तयार केली जात आहेत. २० डिसेंबरला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार संख्येनुसार केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. ८०० मतदारांसाठी एक केंद्र केले जाणार असल्याने ८३ केंद्र वाढणार आहेत. त्यामुळे एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८४ वर जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्च, अर्ज दाखल करण्यासाठीची तयारी आदींबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेने राजकीय पक्षांची बैठक बोलवली आहे. सकाळी अकरा वाजता होणाऱ्या बैठकीत विविध प्रश्नांचे निराकरण करण्यात येणार आहे.
Development India-G Ram G Bill Passed : लोकसभेत बहुचर्चित ‘विकसित भारत-जी राम जी’ विधेयक मंजुरीवरून प्रचंड गदारोळLatest Marathi Live Updates 19 December 2025 : लोकसभेमध्ये बहुचर्चित ‘विकसित भारत-जी राम जी’ विधेयक मंजुरीवरून प्रचंड गदारोळ झाला. हे विधेयक संसदीय स्थायी समितीकडे पाठविण्यासाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्याच्या प्रती फाडून टाकत कागदपत्रे हवेमध्ये भिरकावली. तसेच मागील दोन आठवड्यांपासून चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. घटलेली रुपयाची किंमत आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेने केलेली व्याजदर कपात याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होताना दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच नियमानुसारच स्थापन झाल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने याविरोधातील आव्हान याचिका फेटाळली. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर काम चालले. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडे सोपविला असून, पवार यांनी हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे. महायुतीतील सामंजस्य टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील असून, या पक्षाने मुंबई महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी ‘५० : २५ : ११’ असे सूत्र निश्चित केले आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..