Public Holiday: राज्यात शनिवारी या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी; शाळा, सरकारी कार्यालये राहणार बंद
Saam TV December 19, 2025 10:45 PM

उद्या राज्यात अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी

उद्या अनेक ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपालिकेसाठी मतदान

ज्या ठिकाणी मतदान होणार तिथे सार्वजनिक सुट्टी

राज्यात उद्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या उरलेल्या जागांसाठी मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजीदेखील नगरपंचायतीसाठी मतदान झाले होते. दरम्यान, काही जागांवर अजूनही मतदान होणे बाकी आहे. ही मतदानाची प्रक्रिया उद्या म्हणजेच २० डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, उद्या ज्या ठिकाणी मतदान आहे तिथे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

School Holiday: महत्त्वाची बातमी! आज राज्यातील शाळांना सुट्टी; का राहणार बंद? वाचा सविस्तर

यवतमाळसह तीन पालिका क्षेत्रात सुट्टी जाहीर

निवडणूकआयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार यवतमाळ नगरपरिषद, वणी- दिग्रस तसेच पांढरकवडा नगरपरिषद साठी उद्या 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क निर्विघ्नपणे बजावता ,यावा यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सुट्टी जाहीर केली आहे. यवतमाळ पालिकेत सर्वच प्रभागात मतदान होणार आहे. दिग्रस येथे तीन प्रभाग तर पांढरकवडा दोन आणि वणी येथे एक असे तीन पालिकेतील सहा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

२० डिसेंबरला ज्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी असणा आहे तर सर्व नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.

Bank Holiday in December: डिसेंबरमध्ये १९ दिवस बँका राहणार बंद, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच निवडणुकीच्या काळात कोणालाही सुट्ट्या घेता येणार नाहीत, असे प्रशासकांनी सांगितले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात सर्व विभागप्रमुखांसाठी त्यांनी परिपत्रक काढले. निवडणूक होईपर्यंत आता कोणालाही सुट्या घेता येणार नाहीत. महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण संपेपर्यंत आणि नव्याने परिपत्रक निघेपर्यंत कोणालाही सुट्ट्या घेता येणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूकीसाठी नऊ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय राहणार आहे. प्रत्येक कार्यालयाला निवडणूक साहित्य उपलब्ध करून द्यावे असे निर्देश गुरुवारी एका बैठकीत प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले.

Bank Holidays: कामाची बातमी! देशभरात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी; कारण काय?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.