'भरधाव दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू'; सांगाेला तालुक्यातील घटना, दुचाकीच्या मागे बसल्या हाेत्या अन् काय घडलं..
esakal December 19, 2025 10:45 PM

सांगोला : खवासपूर (ता. सांगोला) येथील शिवारात भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्चित..

बाळू चंद्रा टिंगरे (रा. लोटेवाडी, ता. सांगोला) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच ४५ बीबी १४६९) ही दिघंची ते खवासपूरला जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. खवासपूर गावातील मराठी शाळेजवळील गतिरोधकावरून गाडी वेगात गेल्याने दुचाकीवरील मागे बसलेल्या सुनीता अशोक लोहार (वय ३३, रा. गोंदावले, ता. माण, जि. सातारा) या खाली पडल्या.

त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृत महिलेचे पती अशोक बबन लोहार (वय ४०, रा. गोंदावले, ता. माण, जि. सातारा) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार बोराटे करीत असून, गुन्ह्याची नोंद पोलिस हवालदार माने यांनी केली आहे.

होता स्कार्फ म्हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्.. शेकोटीचा पेट; विवाहिता भाजली

सोलापूर : थंडीमुळे घरासमोर शेकोटी पेटवून नताशा संभाजी शिंदे (वय ३०, रा. कुर्डू, ता. माढा) या शेकत बसल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांचा गाऊन पेटला. त्यात त्यांच्या दोन्ही मांड्यांना, पोटाला, कमरेजवळ भाजले आहे. कुर्डुवाडीतील सरकारी दवाखान्यातून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्ण शुद्धीवर असल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.