swt195.jpg
11801
चंद्रकांत जठार, अमोल सोरप, श्रीधर कल्याणकर
तळेरे व्यापारी संघटना
अध्यक्षपदी चंद्रकांत जठार
तळेरे, ता. १९ः येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत ऊर्फ राजू जठार यांची निवड करण्यात आली. येथील आदर्श व्यापारी संघटनेची सर्वसाधारण बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी गावातील दिवंगत तसेच कस्तुरी पाताडे हिला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेली नवीन कार्यकारिणी अशी ः चंद्रकांत (राजू) जठार (अध्यक्ष), अमोल सोरप (कार्याध्यक्ष), श्रीधर कल्याणकर (सेक्रेटरी), आदित्य महाडिक (सहसेक्रेटरी), चंद्रशेखर डंबे (उपाध्यक्ष), सागर डंबे (खजिनदार), अशोक तळेकर (सहखजिनदार), सचिन वाडेकर, भरत राठोड, सचिन पिसे, सूरज बिद्रे, निखिल जमदाडे, जयेश ढेकणे, पप्या पेडणेकर, चंद्रकांत जाधव (सर्व सदस्य) तर सल्लागार म्हणून हनुमंत तळेकर, राजेंद्र पिसे, दशरथ कल्याणकर, अभय भांबुरे, नामदेव वाडेकर, प्रविण वरुणकर, वैभवकुमार कल्याणकर, भाई लडगे यांची निवड करण्यात आली.