Nagpur News: चारा आणायला गेलेली परतलीच नाही; दुसऱ्या दिवशी नाल्याजवळ नग्न अवस्थेतील मृतदेह, घातपाताचा संशय
esakal December 20, 2025 07:45 AM

धामणा (लिंगा) : नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पेठ (काळडोंगरी) परिसरातील नेरी (मानकर) मार्गावर नाल्याजवळ एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने गुरुवारी (ता.१८) सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली.

मृतदेह नग्न अवस्थेत असून डोक्याच्या मागील भागावर गंभीर मार असल्याचे निदर्शनास आल्याने संशय बळावला आहे. यशोदा रामकृष्ण बावणे (वय ७४, रा. पेठ (काळडोंगरी) पोस्ट व्याहाड) असे मृत महिलेचे नाव आहे.

त्या नेहमीप्रमाणे बुधवारी (ता.१७) सकाळी साडेआठच्या सुमारास गायी-बकऱ्यांसाठी चारा आणायला शिवारात गेल्या होत्या. मात्र संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने भाचा रामकृष्ण चिरकूट बावणे यांनी शोधाशोध केली; रात्री उशीर झाल्याने त्या सापडल्या नाहीत.

गुरुवारी (ता.१८) सकाळी नेरी (मानकर) रोडवरील नाल्याजवळ, रहागंडाले ले-आऊटपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली व मृतदेहाची ओळख पटली. तत्काळ हिंगणा पोलिसांना माहिती देण्यात आली.

Beed News: माजलगाव तेलगाव मार्गावर पडक्या घरात वयोवृद्धाचा कुजलेला मृतदेह; दोन विषाच्या बाटल्या अन्...

पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक लॅबचे पथकही पाचारण करण्यात आले. नागपूर झोन-१ चे डीसीपी ऋषिकेश रेड्डी व वाडी एमआयडीसीचे एसीपी सतीश गुरव यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.