पाथर्डी : स्व. गोपीनाथ मुंडे यांनीच मला राजकारणात पुढे आणण्याचे काम केले. सात दशके देशावर राज्य करणाऱ्यांनी शहराकडे दुर्लक्ष केले होते. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट काहींना आम्ही लखपती दिदी करणार असून, या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या अभय आव्हाड यांच्यासह सर्व उमेदवारांना निवडून द्या, पुढची जबाबदारी माझी असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्चित..वीर सावरकर मैदानावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, सुरेश धस, दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, अक्षय कर्डिले, सुवेंद्र गांधी, विवेक नाईक, राहुल राजळे, धनंजय बडे, दिगंबर भवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभय आव्हाड उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे यांनीच मला राजकारणात पुढे आणण्याचे काम केले. सात दशके देशावर राज्य करणाऱ्यांनी शहराकडे दुर्लक्ष केले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर स्मार्ट सिटी, हर घर जल, अशा विविध योजना राबवून शहरांचा विकास करण्यात आला. शहरात आलेल्या अनेकांनी जागा मिळेल तेथे घरे, झोपड्या बांधल्या. ज्यांनी अशी अतिक्रमणे केली ती नियमित करण्याचे काम आम्ही करत पंतप्रधान आवास योजनेतून या लोकांची घरे बांधून दिली.
भूमिगत गटार योजना का राबवता, असे म्हणणाऱ्यांची मला किव येते. या योजनेमुळे शहराचे आरोग्य सुधारते, या कामासाठी रस्ते खोदले गेले असले, तरीही नवीन रस्त्यासाठी निधी देण्यात आला आहे. शहरातील लोकांना नियमित पाणी व वीज मिळावी, प्रदूषणमुक्त शहरे निर्माण करणे, ही कामे आम्ही हाती घेतली आहेत. ही निवडणूक पालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी नाही, तर केंद्र व राज्याच्या योजना तुमच्यापर्यंत योग्य व्यक्तींच्या हातून पोहोचवण्यासाठी आहे. येथे भाजपला साथ द्या. वकील संघाने न्यायालयासाठी नवीन इमारतीची मागणी केली आहे, ती आपण पूर्ण करू, असेही फडणवीस म्हणाले.
राजळे म्हणाल्या की, विरोधी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने लिंगायत समाजाच्या जमिनीवर आरक्षण टाकत भूखंड गिळंकृत केला आहे. या कामाची चौकशी व्हायला हवी. आमच्यावर टीका करणाऱ्यांचा कारखाना अडचणीत आला, तर फडणवीस यांनीच मदत केली. मात्र, तरीही ते म्हणतात, या शासनाने काय दिले? मी स्वतः कारखानदार असल्याने व शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने त्यांच्या कारखान्याला निधी देण्यास विरोध केला नाही, अशी टीका त्यांनी ढाकणे यांचा नामोल्लेख टाळून केली. सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले. आभार धनंजय बडे यांनी मानले.
होता स्कार्फ म्हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्.. राजळे खऱ्या लाडक्या बहीणराज्यात साडेसहा कोटी लाडक्या बहिणी असल्या, तरीही विधानसभेच्या सभागृहात माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या मोनिका राजळे या खऱ्या लाडक्या बहीण आहेत. त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा आहे, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.