अखेर राहुल गांधींमुळे कोकाटे वाचले? दाखले आणि संदर्भ… नेमकं काय घडले कोर्टात..
Tv9 Marathi December 20, 2025 05:45 AM

माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आलंय. हेच नाही तर माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांनी स्वत:कडे क्रीडा खाते ठेवले. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात कोकाटे यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आज या प्रकरणातील सुनावणी हायकोर्टात पार पडली. कोकाटेंच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली नाही. माणिकराव कोकाटेंची अटक टळली आहे. कोकाटेंना 2 वर्षांची जेल होणार नाही. कोकाटेंना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. अटक वॉरंट कोर्टाने माणिकराव कोकाटेंविरोधात काढले होते. शेवटी जामीन मंजूर करण्यता आला आहे. यादरम्यान कोर्टाने अनेक युक्तीवाद झाले. 1 लाखाच्या जाचमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला.

मी या प्रकरणात अद्याप कोणताही अंतरिम दिलासा देण्याचे आदेश दिलेले नाहीत असे कोर्टाने युक्तीवादादरम्यान स्पष्ट केले. कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम प्रकरणाची सुरुवातीची पार्श्वभूमी कोर्टामोर मांडत होते. कोकाटे यांचे वकील युक्तिवाद करत असताना जुन्या आदेशात साक्षीदार असणाऱ्या पोलीस पाटील यांच्या स्टेटमेंटचे दाखला देत होते.

जुन्या आदेशात कोकाटे यांची 1990 ची आर्थिक परिस्थिती आणि पुढच्या काही वर्षात बदललेली आर्थिक परिस्थिती याचे संदर्भ देण्यात आले आहेत. आर्थिक परिस्थिती तशीच राहते का ? ती बदलत असते, असाही युक्तीवाद करण्यात आला.  बनावट कागदपत्रांसाठी लावण्यात आल्या कलमांसंदर्भात युक्तिवाद करताना रवींद्र कदम यांची कोर्टासमोर माहिती दिली.

माणिकराव कोकाटे प्रकरणातील युक्तीवादादरम्यान वकिलांनी कोर्टात राहुल गांधीच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर दिला. शिक्षेला स्थगिती देण्याची प्रमुख मागणी केली. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेला रिपोर्ट कोर्टात मांडण्यात आला. कोकाटे यांच्या वकिलांनी त्यांचा मेडिकल रिपोर्ट मांडला. आयसीयूच्या बेड नंबर 9 मध्ये एडमिट आहेत माणिकराव कोकाटे.

कोकाटे यांची होणार एंजिओप्लास्टी डॉक्टरांचा कोर्टात अहवाल देखील देण्यात आला. खासदार अफजल अन्सारी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय याआधी झाला होता त्याचा दाखला कोकाटे यांच्या वकिलानी कोर्टासमोर दिला. अफजल अन्सारी यांच्या 4 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली होती. थोडक्यात काय तर राहुल गांधी यांच्यामध्ये माणिकराव कोकाटे वाचल्याचे म्हणावे लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.