swt197.jpg
11813
सावंतवाडीः संताजी जगनाडे महाराज आणि श्री देवी सरस्वती यांच्या मूर्तीला हार घालताना तुकाराम तेली, एकनाथ तेली, महेश तेली, शुभांगी तेली, दिनकर तेली, श्रीकृष्ण तेली, नरहरी तेली आणि श्याम निवेलकर.
जगनाडे महाराजांना सावंतवाडीत अभिवादन
पुण्यतिथी उत्सवः मार्गदर्शनासह विविध कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः येथील तेली समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी ज्ञाती बांधवांतर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य संताजी जगनाडे महाराजांची ३२६ वी पुण्यतिथी (राष्ट्रसंत) चंद्रभागा निवास, परमपूज्य संताजी नगर, दिनकर तेली यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरी करण्यात आली.
तेली समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडीचे संस्थापक तथा विद्यमान सल्लागार जयश्री जयराम आजगांवकर या दांपत्याने पंडितांच्या सहकार्याने विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती, तीर्थ प्रसाद, महाप्रसाद उत्तम रीतीने पार पडला. या कार्यक्रमासाठी तेली समाजातील बांधवांशिवाय परजातीतील, परधर्मातील बांधव सुद्धा उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख पाहुणे तुकाराम तेली तसेच प्रमुख वक्ते एकनाथ तेली यांच्या हस्ते २०२६ या वर्षीच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम तेली, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्यासह नरहरी तेली, सदस्य सिंधूदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ, शुभांगी तेली,श्याम निवेलकर उपस्थित होते. श्री. तेली यांनी सर्व उपस्थित ज्ञाती बांधवांना सहज योगासन प्रात्यक्षिक दाखवून महत्व पटवून दिले तसेच यामुळे आपल्याला सक्षम बनवून आपले जीवन सुखकारक शतायूशी कसे बनते याचे तसेच आपल्या मुलाबाळाना सुद्धा बुद्धिवान बनवण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ते एकनाथ तेली यांनी ‘राव न करी ते गावं करी’ ही उक्ती पटविताना आपला आदर्श सांगून मुलाबाळाना चांगले संस्कार देऊन वृद्धाश्रमास प्रवृत्त करण्यापासून वाचविण्याचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्यामराव निवेलकर यांनीसुद्धा आपल्या पाल्याला चांगले संस्कार देऊन मोठे करा जेणे करून आपला समाज सुजलाम सुफलाम होईल याबद्दल मार्गदर्शन केले. बाळ आजगावकर यांनी ताजी जगनाडे महाराज यांचे ८ डिसेंबर १६२४ पासून ७६ वर्षांचे संपूर्ण जीवन चरित्र सादर केले.