Weight Loss: सकाळी रिकाम्या पोटी काय खावं? तज्ञांचा सल्ला फॉलो केल्यास झटपट होईल वजन कमी
Marathi December 20, 2025 05:25 PM

आजकाल धावपळीच्या जीवनात खाण्याच्या सवयींपासून ते जीवनशैलीपर्यंत सर्व काही पूर्णपणे बदलले आहे. यामुळं लठ्ठपणा आणि पोटाची चरबी वाढणं ही एक सामान्य समस्या बनली आहे. शरीरात चरबी वाढल्यानंतर ती नियंत्रित करणं खूप कठीण होतं. सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टी घेणं शरीरासाठी चांगलं असतं. कारण शरीराला सकाळी ऊर्जेची गरज असते अशावेळी तुम्ही काही गोष्टी सकाळी घेतल्याने शरीरातील फॅट्स जलद गतीने बर्न होतात. ( Early Morning Healthy Eating For Weight Loss )

सकाळी काय खावं?
आरोग्य आणि फिटनेस तज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी सकाळचा पौष्टिक नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण सकाळी लवकर जे अन्न घेतो ते शरीराला दिवसभर ऊर्जावान आणि सक्रिय ठेवण्यास मदत करतं. त्यामुळंच सकाळचा नाश्ता प्रथिने आणि उर्जेने समृद्ध असावा. रिकाम्या पोटी संतुलित, हलका आणि पौष्टिक नाश्ता घेतल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

वजन कमी करण्यासाठी सकाळी सर्वात आधी कोमट पाण्यात लिंबू घालून प्यावं आणि मध, जिरे पाणी आणि आवळा रस इत्यादी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ड्रिंक्स आहेत. लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून एक ग्लास कोमट पाण्यात पिल्यानं शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात आणि चरबी जाळण्यास मदत होते. रात्रभर पाण्यात जिरे भिजवून ते पाणी उकळून, गाळून घेतल्यानं पचनक्रिया सुधारते. याशिवाय रिकाम्या पोटी आवळा रस पिल्याने चयापचय वाढते. नाश्ता करण्यापूर्वी उठल्या उठल्या हे ड्रिंक्स घ्यावे.

हेही वाचा: Detox Water: लिंबू, जिरे, बडीशेप की तुळशीच्या पानांचं पाणी; सकाळी रिकाम्या पोटी काय घेणं जास्त चांगलं?

वरील ड्रिंक्स घेतल्यानंतर रात्रभर भिजवलेले बदाम, अक्रोड किंवा पपई घ्या. हे पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते कारण भिजवलेले बदाम आणि अक्रोडमध्ये निरोगी चरबी आणि प्रथिने असतात. त्यामुळं पोट भरलेलं राहतं आणि दिवसभर ताजतवानं वाटतं. शिवाय सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणं पोट साफ होण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे.

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.