राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड व पडसाळी परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध बॉक्साईट उत्खननावर गुरुवारी रात्री छापा टाकण्यात आला. यामध्ये दोन ट्रक पकडण्यात आले. या परिसरामध्ये चोरटे बॉक्साईट उत्खनन सुरू असल्याबद्दल वारंवार तक्रारी होत होत्या.
मात्र, याची फारशी दखल घेतली जात नव्हती. यामुळे राधानगरी तालुका गौण खनिज बचाव कृती समितीचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी थेट खनिकर्म अधिकारी अजित पाटील व जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री व महसूलमंत्र्यांना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती.
Kolhapur Bauxite : इको-सेंसिटिव्ह दुर्गमानवाड–पडसाळीत झाडे तोडून बॉक्साइट उत्खनन; पर्यावरण धोक्यातयाची दखल घेऊन अखेर खनिकर्म अधिकारी पाटील यांनी सापळा रचून गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास दुर्गमानवाड, तळगाव आणि पडसाळी परिसरातील उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी व दुर्गमानवाड येथील चौकामध्ये थांबून कारवाई केली. रात्री बॉक्साईट भरलेले दोन ट्रक त्यांनी ताब्यात घेतले. शिवाय जागेवर जाऊन पाहणी केली; मात्र चोरटे पसार झाले होते.
या परिसरामध्ये चोरटे बॉक्साईट उत्खनन सुरू असल्याबद्दल वारंवार तक्रारी होत होत्या. मात्र, याची फारशी दखल घेतली जात नव्हती. यामुळे राधानगरी तालुका गौण खनिज बचाव कृती समितीचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी थेट खनिकर्म अधिकारी अजित पाटील व पालकमंत्री व महसूलमंत्र्यांना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती.
Kolhapur Crime : अंबप फाट्यावर अफू विक्री रॅकेटचा पर्दाफाश! सहा महिन्यांपासून भाडेकरू राहिलेले दोन राजस्थान तरुण अटकेतयाची दखल घेऊन अखेर खनिकर्म अधिकारी पाटील यांनी सापळा रचून गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास दुर्गमानवाड, तळगाव आणि पडसाळी परिसरातील उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी व दुर्गमानवाड येथील चौकामध्ये थांबून कारवाई केली. रात्री बॉक्साईट भरलेले दोन ट्रक त्यांनी ताब्यात घेतले. शिवाय जागेवर जाऊन पाहणी केली; मात्र चोरटे पसार झाले होते.
या कारवाईबाबत येथील तहसीलदार अनिता देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून, त्यामध्ये दोन ट्रक ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी वैभव विठ्ठल ठिगरे (रा. कवठेमहांकाळ) व गौरी शंकर (रा. झारखंड) या चालकांना ताब्यात घेतले आहे.
यापूर्वीही दोन ट्रकवर कारवाई केली असून, उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी चरी काढून रस्ते बंद केले होते. तसेच संबंधित गट नंबरवर बोजाही नोंद करण्यात आला असून, असे प्रकार घडत असल्यास महसूल विभागाला कळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
ही कारवाई खणीकर्म विभाग, राधानगरी महसूल विभाग आणि पोलिसांच्या वतीने करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. सखोल चौकशी व्हावी.
जिल्हा खनिकर्म विभागाने रात्री ही कारवाई केली. त्यानंतर आज सकाळपासून या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनी राजकीय दबाव टाकून प्रकरण पुढे न जाण्यासाठी हालचाली सुरू होत्या. प्रकरणावर पडदा टाकण्याचा ठेकेदार व खरेदीदार प्रयत्न करीत होते. त्यांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राधानगरी तालुका गौण खनिज बचाव कृती समितीचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी केली आहे.