>> नीलिमा प्रधान
मेष – कठीण कामे करून घ्या
सूर्य, चंद्र लाभयोग. चंद्र, गुरू प्रतियुती. सप्ताहाच्या सुरुवातीला कठीण कामे करून घ्या. गैरसमज दूर करता येईल. साडेसातीचे पर्व सुरू आहे. नोकरीतील अडचणी कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 21, 22
वृषभ – वाहनाचा वेग कमी ठेवा
चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, गुरू युती. तुमच्या क्षेत्रात तडजोड स्वीकारून कामे करावी लागतील. कठोर शब्द घातक ठरतील. नुकसान टाळता येईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. कायदा पाळा. शुभ दि. 23, 24
मिथुन – कठोर शब्द वापरू नका
चंद्र, गुरू प्रतियुती, सूर्य चंद्र लाभयोग. रेंगाळलेली कामे करून घ्या. नोकरीत चांगली संधी लाभेल. धंद्यात कलाटणी देणारी घटना घडेल. कठोर शब्द वापरू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्याने जम बसेल. लोकसंग्रह वाढेल. शुभ दि. 21, 25
कर्क – विचारपूर्वक निर्णय घ्या
चंद्र, बुध लाभयोग, शुक्र हर्षल षडाष्टक योग. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. कुणालाही कमी लेखू नका. कामाचे श्रेय दुसऱयाला देण्यात येईल. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांशी समविचाराने बोला. शुभ दि. 23, 24
सिंह – धंद्यात हलगर्जी नको
सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र, शनि केंद्रयोग. व्यावहारिक निर्णय जपून घ्या. नोकरीत धावपळ होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक. धंद्यात हलगर्जी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर लक्ष द्या. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. 21, 25
कन्या – कामाचा व्याप राहील
चंद्र, गुरू प्रतियुती, चंद्र, बुध लाभयोग. सप्ताहाच्या मध्यावर मनाविरुद्ध निर्णय घ्याल. कामाचा व्याप राहील. कायदा पाळा. नोकरीत गैरसमज होतील. वादविवाद वानका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मतप्रदर्शनाची घाई नको. शुभ दि. 23, 24
तूळ – तणाव वाढवू नका
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रात पुजाण्याची संधी मिळेल. क्षुल्लक तणाव वानका. कुणालाही कमी लेखू नका. स्पर्धा करणारे वावसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. शुभ दि. 21, 25
वृश्चिक – प्रत्येक दिवस उत्साहाचा
सूर्य, चंद्र लाभयोग, बुध, गुरू षडाष्टक योग. प्रत्येक दिवस उत्साहवर्धक ठरेल. मत व्यक्त करताना संयम ठेवा. नोकरीत महत्त्वाच्या कामावर मेहनत घ्यावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शत्रू-मित्र यांचे वर्गीकरण धाडसाचे ठरेल. शुभ दि. 21, 22
धनु -वाद वाढवू नका
सूर्य, चंद्र लाभयोग, शुक्र शनि केंद्रयोग. प्रत्येक दिवस आत्मविश्वास ठरेल. कोणतेही काम करताना सावध रहा. दुखापत टाळा. वाद वानका. कला, साहित्याला नवा विषय मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कारवाया समजतील. शुभ दि. 23, 24
मकर – प्रवासात घाई नको
शुक्र, हर्षल षडाष्टक योग, चंद्र गुरू प्रतियुती. क्षेत्र कोणतेही असो संयम बाळगा. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे सांभाळा. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात फसगत टाळा. शुभ दि. 25, 26
कुंभ – लोकप्रियता वाढेल
सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र शनि लाभयोग. शत्रू व मित्र ओळखणे कठीण आहे, तेव्हा योग्य निर्णय घ्या. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात उधारी देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढेल तरीही चौफेर सावध रहा. शुभ दि. 21, 25
मीन -योजनांना गती मिळेल
चंद्र, गुरू प्रतियुती, सूर्य, चंद्र लाभयोग. महत्त्वाची कामे होतील. नवीन परिचय प्रेरणादायी ठरतील. नोकरीतील अडचणी कमी होतील. कामे रेंगाळत ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. स्पर्धेत प्रगती. शुभ दि. 21, 22