मनी मानव व्यर्थ चिंता वाहते
Marathi December 21, 2025 11:25 AM

>> संध्या शहापुरे

शाळेत असताना पाठय़पुस्तकात आम्हाला एक कविता होती ‘चिंतातूर जंतू’. राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांची कविता. ‘चिंतातूर जंतू , कसली कसली चिंता करतो पहा! निजले जग का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला? काय म्हणावे त्या देवाला… तेज रवीचे फुकट सांडले उजाड माळावर उघडय़ा… उधळणूक बघवत नाही! हिरवी पाने उगाच केली झाडावर इतकी का ही? मातीत त्यांचे काय होत असे… पुराबरोबर फुकटावारी पाणी हे वाहून जाते, काय करावे जीव तळमळे…  ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त? भरती मूर्खांची होत ना!  आहेत ना या मूर्खासारख्या चिंता. आपणही अशाच व्यर्थ चिंता करत असतो.अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींची चिंता. नोंद करा स्वतशीच. चिंता करून कोणाचे कधी प्रश्न सुटलेत का? जे काही घडत असतं ते आपल्याच कर्मामुळे असतं, नाही का? अभ्यास नाही केला तर नापास होणारच. तशाच सर्व चिंता. मनात आलेला लहानसा विचार चिंतेचं रूप कधी घेतो तेदेखील कळत नाही. चिंतेने मन दुबळं होतं. शरीर निक्रिय होतं. विवेक भ्रष्ट होतो. म्हणतात ना, चिंता आणि चितामध्ये केवळ एका अनुस्वाराचा फरक आहे. या दोन्ही शब्दांपासून स्वतच्या मनाला दूर ठेवता आलं पाहिजे. कारण कर्मयोगाने जे घडणार आहे ते घडणारच. त्याबद्दल खेद मांडणाऱ्याची गणना रामदास स्वामींनी मतिमंद म्हणून केली आहे. विवेकी व्हा एवढंच!

मनी मानव व्यर्थ चिंता वाहते।

अकस्मात होणार होऊन जाते।

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे।

मला तुमच्यापासून वेगळे झाल्याबद्दल खेद वाटतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.