२० डिसेंबर २०२५ रोजी ग्रहांचा राजकुमार ‘बुध’ याने ज्येष्ठा नक्षत्रात गोचर केला आहे. बुधाचा हा गोचर वृश्चिक राशीत असताना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला आहे. आता २९ डिसेंबरपर्यंत बुध ज्येष्ठा नक्षत्रातच संचार करणार आहे. मात्र, याच कालावधीत बुधाचा राशि गोचरही होईल म्हणजे २९ डिसेंबर २०२५ पर्यंत बुध वृश्चिक राशी आणि ज्येष्ठा नक्षत्रातच राहणार आहे.
मिथुन आणि धनु राशीव्यतिरिक्त मीन राशीच्या जातकांसाठीही बुध गोचर आनंद घेऊन आला आहे. जर तुम्हाला त्वचेशी संबंधित काही त्रास असेल तर तो दूर होईल. तसेच आरोग्यात पूर्वीपेक्षा सुधारणा दिसेल. जे लोक अनेक वर्षांपासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना एखाद्या नव्या मित्राच्या मदतीने नोकरी लागू शकते. व्यवसाय करणाऱ्या जातकांच्या हाती मोठा ऑर्डर लागेल, ज्यामुळे चांगला नफा होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)