माधुरी दीक्षित सेल जुहू फ्लॅट मुंबई: बॉलिवूडची (Bollywood News) ‘धक-धक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene) आणि तिचे पती डॉ. श्रीराम माधव नेने यांनी मुंबईतील (Mumbai News) सर्वात पॉश भागात असलेल्या जुहू इथली मालमत्ता विकून त्यांचा नफा जवळजवळ दुप्पट केला आहे. सीआरई मॅट्रिक्सनं कराराच्या कागदपत्रांवरुन दिलेल्या माहितीनुसार, हा करार 15 डिसेंबर 2025 रोजी नोंदणीकृत झाला होता. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, जुहूमध्ये अनेक चित्रपट कलाकारांचं घर आहे. कुशमन अँड वेकफिल्डनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात जुहूमधील मालमत्तेच्या किमती 3 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Bollywood Actress Madhuri Dixit) नेनेनं तिचा जुहू परिसरातील त्यांचा फ्लॅट 3.90 कोटींना विकला आहे. 13 वर्षांपूर्वी माधुरीनं 1.95 कोटींना खरेदी केलेला 780.13 चौरस फूटांचा हा फ्लॅट 99.22 टक्क्यांनी नफा कमावला आहे.रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स फर्म ‘CRE मॅट्रिक्स’नं मिळवलेल्या कागदपत्रांमध्ये हा व्यवहार उघड झाला आहे. जुहू हा मुंबईतील एक अत्यंत महागडा परिसर आहे, जिथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहतात. माधुरी आणि तिच्या पतीनं या मालमत्तेची विक्री केली आहे, जी किंमत जवळजवळ दुप्पट आहे, ती गेल्या दशकात मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमधील वाढीचं प्रतिबिंब आहे.
माधुरीचा हा फ्लॅट आयरिस पार्क येथील ‘दीप वर्षा सहकारी गृहनिर्माण संस्थे’च्या चौथ्या मजल्यावर आहे. त्याचा कार्पेट एरिया 780.13 स्क्वेअर फूट आहे. कागदपत्रांवरून असं दिसून येतं की, त्याची नोंदणी 15 डिसेंबर रोजी झालेली. हा फ्लॅट एका महिलेनं खरेदी केला होता, जिनं 19.5 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. महाराष्ट्र सरकारनं महिला घर खरेदीदारांना दिलेल्या विशेष 1 % सवलतीचा तिनं फायदा घेतला.
जुहूमधील मालमत्तेच्या किमती वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे, त्याचं प्राईम लोकेशन आणि मर्यादित उपलब्धता आहे. कारण या किनारी भागांत नव्या बांधकामासाठी जागेची तीव्र कमतरता आहे. रिअल इस्टेट तज्ज्ञ आणि CRE मॅट्रिक्स सारख्या डेटा प्लॅटफॉर्मच्या मते, जुहूच्या मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्प आणि सेलिब्रिटींमध्ये त्याची लोकप्रियता यामुळे मागणी वाढली आहे. याव्यतिरिक्त, कोस्टल रोड प्रकल्प आणि सुधारित कनेक्टिव्हिटीसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे, ज्यामुळे गेल्या दशकात मालमत्तेच्या किमती जवळजवळ दुप्पट झाल्या आहेत.
यापूर्वी, माधुरी दीक्षितनं मुंबईच्या पॉश लोअर परळ परिसरात 48 कोटींना एक अपार्टमेंट खरेदी केलं होतं. हे अपार्टमेंट ‘इंडियाबुल्स ब्लू’ प्रकल्पात आहे आणि 28 सप्टेंबर 2022 रोजी नोंदणीकृत झालेलं. 53 व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटचं एकूण क्षेत्रफळ 5,384 चौरस फूट आहे.
दरम्यान, मुंबईतील जुहू परिसर गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूड स्टार्ससाठी एक आवडतं ठिकाण आहे. अनेक दिग्गज अभिनेत्यांचे इथे आलिशान बंगले आणि अपार्टमेंट आहेत. अमिताभ बच्चन यांचे जुहूमध्ये अनेक बंगले आहेत, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध ‘जलसा’ आहे, जिथे ते त्यांच्या कुटुंबासह राहतात. त्याच भागात त्यांचे ‘प्रतिक्षा’ आणि ‘जनक’ नावाचे बंगले देखील आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा