सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा, आई पूनमने थेट म्हटले, दोन वर्ष..
Tv9 Marathi December 21, 2025 10:45 AM

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाबद्दल विविध चर्चा रंगताना दिसतात. सोनाक्षी आणि अभिनेता जहीर इक्बाल यांनी काही वर्ष एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न केले. मात्र, सुरूवातीला सोनाक्षी सिन्हा हिने आपल्या आणि जहीरच्या नात्याबद्दल कोणालाच काही सांगितले नव्हते. सोनाक्षी सिन्हा हिने फराह खानसोबत नुकताच तिच्या आणि जहीरच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. सोनाक्षी सिन्हा हिने म्हटले की, माझ्याबद्दल आणि जहीरबद्दल मी सर्वात अगोदर माझ्या आईलाच सांगितले होते. यादरम्यान जहीर इक्बाल याचीही आई उपस्थित होती. सोनाक्षी सिन्हा हिची आई पूनम सिन्हा यांनी म्हटले की, दोन वर्ष मी सतत सोनाक्षी आणि जहीरच्या नात्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांना मनवत होते.

फराह खानने सोनाक्षी सिन्हा हिच्या आईला विचारले की, तुम्हाला साखरपुड्याच्या अगोदर माहिती होते का हे दोघे किती वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत? यावर पूनम यांनी म्हटले की, नाही… सोनाक्षी लगेचच तिच्या आईला म्हणते की, खोटे बोलू नको… ही गोष्ट मी सर्वात अगोदर तुलाच सांगितली होती. तू पप्पांना त्याबद्दल सांगितले नव्हते. यावर पूनम यांनी म्हटले की, मला याबद्दल फक्त दोन वर्ष अगोदर समजले होते.

ते दोन वर्ष मी शत्रुघ्न सिन्हा यांना याकरिता पटवत होते. यावर जहीर इक्बाल याने सांगितले की, ज्यावेळी आमच्या रिलेशनला 5 वर्ष पूर्ण झाली होती, त्यावेळी मम्मीला समजले, त्यापूर्वी त्यांना कोणत्याही पद्धतीचा संशय नव्हता. यावर पूनम यांनी म्हटले की, मला संशय आला होता. ज्यावेळी सोनाक्षी खुश करण्यासाठी घरात काम करत होती. आईपासून काही लपून राहू शकत नाही.

तिला सर्वकाही माहिती असते. माझी आई आणि जहीर इक्बालची आई फार अगोदर भेटल्या होत्या. हुमा कुरैशीच्या घरी आम्ही सर्वांच्या आई वडिलांना बोलवत एक कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी पूनम यांनी म्हटले की, मला त्याचवेळी संशय आला होता कारण सोनाक्षी मुमताज (जहीर इक्बालची आई) यांच्या पायाजवळ बसली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.