DMart : डीमार्टमध्ये कपड्यांचा सेल! विंटर डिस्काउंटमध्ये 299 पासून स्वेटर अन् थंडीतल्या वस्तु 92 रुपयांत, 'या' तारखेपासून ऑफर सुरू
esakal December 21, 2025 10:45 AM

D-Mart Sale : थंडीची चाहूल लागताच डीमार्टने ग्राहकांसाठी खास विंटर स्पेशल वस्तु स्टॉकमध्ये आणल्या आहेत. कपडे, टॉयज ते घरगुती वस्तूंपर्यंत सर्व काही स्वस्त दरात मिळत असल्याने स्टोअर्समध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असल्याने लवकरात लवकर खरेदी करा..चला तर मग या डिस्काउंट ऑफर्स काय आहेत आणि वास्तूब किती स्वस्त मिळणार

लहान मुलांसाठी आकर्षक ऑफर्स आहेत. कॅज्यूअल शर्ट फक्त 299 रुपयांपासून, कार्गो पॅंट 499 रुपयांत मिळत आहेत. मुलींसाठी स्वेट शर्ट 399 तर कार्गो पॅन्ट 299 रुपयांत उपलब्ध आहेत. याशिवाय सॉफ्ट टॉय आणि बाहुल्या 92 रुपयांपासून सुरू होत आहेत, ज्यामुळे मुलांचा आनंद गगनात मावणार नाही.

मोठ्या मुलांसाठी (१२-१५ वर्षे) विंटर जॅकेट 399 रुपयांत, स्वेटर 500 रुपयांच्या आत, तर जीन्सही 500 रुपयांच्या आत मिळत आहेत. मुलांसाठी हुडी 499, चेक शर्ट 499 पासून, स्वेट शर्ट 349 तर पफर जॅकेट 1200 रुपयांत उपलब्ध आहेत.

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

महिलांसाठी पफर जॅकेट 799, स्वेटर 799, थंडीचे जॅकेट 599 रुपयांत मिळत आहेत. मोठे ब्लँकेट फक्त 499 रुपयांत, जे थंडीत खूप जास्त फायदेशीर आहे. मऊ मऊ जॅकेट घालून तुम्हाला थंडीचा आनंद घेता येईल

किचन आयटम्सवरही बंपर डिस्काउंट मिळत आहे. ब्रॅंडेड कप आणि चहाचे मग 19 रुपयांपासून, इलेक्ट्रिक केटल 499 रुपयांत आहे जी बाजारात 700-800 रुपयांना विकली जाते. विशेष म्हणजे हिटर रॉड 399 पासून मिळत आहे. थंडीत गरम पाण्याची सोय करणे आता सोपे आणि स्वस्त झाले आहे

Dhurandhar Video : 'धुरंधर' 300 कोटी पार! पण रहमान डकैतच्या रोलमध्ये शाहरुख खान असता तर...व्हायरल AI व्हिडिओ पाहून चाहते शॉक

डीमार्टच्या या सेलमध्ये कुटुंबाच्या सर्व गरजा एकाच छताखाली पूर्ण होत आहेत. ग्राहक म्हणतात, इतक्या स्वस्त दरात दर्जेदार वस्तू मिळणे हे डीमार्टचेच वैशिष्ट्य आहे..स्टोअर्समध्ये स्टॉक लवकर संपण्याची शक्यता असल्याने आजच भेट द्या. कारण या ऑफर्स सध्या dmart स्टोअरमध्ये सुरू आहेत. ही संधी हातची सोडू नका

नोट : ही माहिती डीमार्टच्या इन्स्टाग्राम पेजवर उपलब्ध असलेल्या पोस्टमधून घेण्यात आली आहे. यामध्ये डीमार्टच्या पॉलिसीनुसार बदल होऊ शकतो. सकाळ माध्यम समूह याची पुष्टी करत नाही

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.