इचलकरंजी : महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीतून हात चिन्ह गायब होणार आहे. तत्कालीन नगरपालिकेच्या बहुतांशी निवडणुकीत ‘हात’ चिन्हाचा दबदबा राहिला होता. किंबहुना या चिन्हाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना आटापिटा करावा लागत होता.
आता मात्र आता राजकीय परिस्थिती पू्र्णतः बदलली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून एक चिन्हाचा पॅटर्न राबवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर साहजिकच आता महापालिकेच्या निवडणुकीत मतदान यंत्रणावर मतदारांना ‘हात’ चिन्हाचे दर्शन होणार नाही.
Kolhapur Politics : हुपरी नगरपालिकेत चिन्ह वाटपावरून मोठा गोंधळ, शिट्टी चिन्हावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोळ घातल्याचा आरोप, Videoइचलकरंजीच्या नगरपालिका निवडणुकीत नेहमीच काँग्रेसचा वरचष्मा राहिला होता. अनेकवेळा काँग्रेसची सत्ता नगरपालिकेवर राहिलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ‘हात’ चिन्हाचा कायम रूबाब राहिला आहे.
काँग्रेसने शिव-शाहू विकास आघाडीतून एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार या आघाडीतून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. महापालिका निवडणुकीत, तर हात चिन्ह दिसणार नाही.
Ichalkaranji Politics : इचलकरंजी महाविकास आघाडीत भूकंप! आमदार राहुल आवाडेंनी सतेज पाटलांच्या पदाधिकाऱ्याला लावलं गळालाकधी काळी या चिन्हाचा दबदबा विरोधकांनीही अनुभवला आहे. या चिन्हाची उमेदवारी मिळाली की, ५० टक्के विजय निश्चित मानला जात होता. त्यामुळे हे चिन्ह मिळण्यासाठी पर्यायाने काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत होती.