पुणे : अमेरिकेत नोकरी करणारे अनेक भारतीय सध्या व्हिसा मुद्रांकनासाठी पुणे व देशातील इतर शहरांमध्ये आले आहेत. मात्र, अचानकपणे त्यांच्या व्हिसा मुलाखती व मुद्रांकनाच्या तारखा दोन ते सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्याने ते अडचणीत आले आहेत.
त्यामुळे अनेकजण भारतातच अडकून पडले असून त्यांच्यामध्ये नोकरी, पगार आणि वास्तव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या समाजमाध्यमांवरील हालचाली, जुने संदेश, छायाचित्रे आणि वैयक्तिक मतप्रदर्शन यांची अधिक काटेकोर तपासणी सुरू झाल्याने प्रक्रिया लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.
Indian travelers in USA: भारतीय प्रवासी अमेरिकेत किती दिवस राहू शकतात? दूतावासाने जारी केल्या सूचना ; व्हिसावर अवलंबून नाहीयामुळे आधीच नियोजन करून आलेल्या तरुणांना मोठा आर्थिक आणि मानसिक ताण सहन करावा लागत आहे. व्हिसाची तारीख ठरलेली असल्याने अनेकांनी सुट्ट्या संपवून परत जाण्याची तयारी केली होती. काहींचे घरभाडे, मुलांचे शिक्षण, तसेच नोकरीशी संबंधित करार धोक्यात आले आहेत. काही कंपन्यांनी ठरावीक कालावधीत परत हजर राहण्याची अट घातल्याने चिंता अधिक वाढली आहे.
विशेष म्हणजे, आधी काही आठवड्यांत होणारी प्रक्रिया आता सहा महिन्यांपर्यंत लांबल्याचे संदेश अचानक मिळाल्याने अनेक तरुणांची पंचाईत झाली आहे. पुण्यासह मुंबई, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली आदी शहरांतील स्थितीही तशीच असल्याचे समजते.
व्हिसा मुद्रांकन म्हणजे पासपोर्टवर परदेशात प्रवेश करण्यासाठी अधिकृत शिक्का व नोंद मिळणे. ही नोंद नसल्यास संबंधित व्यक्तीला त्या देशात प्रवेश करता येत नाही, जरी तिच्याकडे वैध परवानगी असली तरी. त्यामुळे व्हिसा मुद्रांकन महत्त्वाचे असते. परदेशात नोकरी, शिक्षण किंवा वास्तव्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीची कागदपत्रे, कामाचा तपशील, वास्तव्याची माहिती आणि पात्रता तपासण्यासाठी प्रक्रिया केली जाते. या माध्यमातून संबंधित देशाची दूतावास यंत्रणा खात्री करून घेते की व्यक्तीचे वास्तव्य व काम नियमांनुसार आहे.
अमेरिकेसारख्या देशामध्ये बहुतांश वेळा व्हिसा नूतनीकरण किंवा नवीन मुद्रांकन हे स्वतःच्या देशातील दूतावासातूनच करावे लागते. म्हणूनच भारतात येऊन प्रत्यक्ष मुलाखत देणे आणि पासपोर्टवर नोंद करून घेणे बंधनकारक असते. त्यामुळे व्हिसाची मुदत संपत आलेले हजारो नोकरदार दरवर्षी भारतात परत येऊन व्हिसाचे नूतनीकरण करून घेत आहेत.
US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?व्हिसाच्या तारखांना होत असलेल्या उशिराबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, तसेच दूतावास पातळीवर प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी विशेष व्यवस्था करणे आवश्यक आहे. वेळेत व्हिसा मिळाला नाही, तर अनेक कुटुंबांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. तसेच, यापुढे अचानक तारखा बदलल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेणेदेखील आवश्यक आहे.
- व्हिसासाठी अर्ज केलेला नोकरदार
गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेने व्हिसा देण्याबाबतचे नियम अधिक कडक केले आहेत. आता तर अर्जदाराची समाजमाध्यमांवरील खातीही तपासली जात आहेत, अशी चर्चा आहे. याबाबत अमेरिकेतील दूतावासाकडून अधिकृतपणे काही सांगण्यात आलेले नाही. व्हिसासाठी काही अर्जदारांना फेब्रुवारी आणि मार्चच्या तारखा मिळाल्या आहेत. त्याबाबतचे मेल त्यांना आलेले आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे.
- डॉ. संग्रामसिंह पवार, आयटी तज्ज्ञ