Kolhapur District Election News : निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच कागल शहरात अभिनंदनाचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकारावर काही उमेदवारांनी तीव्र आक्षेप घेतला असून, यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच काही ठिकाणी उमेदवारांचे अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. यावर आक्षेप नोंदवत एका उमेदवाराने थेट सवाल उपस्थित केला, निवडणूक आयोगाने बॅनर लावणाऱ्यांना आधीच निकाल सांगितला आहे का? असा रोखठोक प्रश्न उमेदवाराने उपस्थित केला.
याचबरोबर या प्रकारामुळे ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा आहे का? असा संशयही उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारे निकाल गृहीत धरून बॅनर लावणे हे लोकशाही व्यवस्थेला धक्का देणारे असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत पोलीस व निवडणूक प्रशासनाने तात्काळ या बॅनरवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास हा प्रकार गांभीर्याने घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी उमेदवारांनी केली आहे. निवडणूक निकालापूर्वी अशा प्रकारचे बॅनर लावल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन मंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आणि गेल्या २० दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा व उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींची मतमोजणी आज (ता. २१) होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार झाली. प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दुपारपर्यंत या नगरपालिकांचे कारभारी निश्चित होणार असून त्यानंतर अनेक ठिकाणी निकालाचा जल्लोष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Nagarpalika Election : कमी मतदानाचा लाभ-फटका कुणाला? मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला नाहीजिल्ह्यात एकूण दहा नगरपालिका व तीन नगरपंचायती आहेत. या १३ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान झाले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार होती. मात्र काही नगरपालिकांमध्ये आरक्षणावरून वाद निर्माण झाला. हा वाद न्यायालयात पोहोचल्याने संबंधित ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या.