Nagar Palika Nivdnuk Nikal Live भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का, अजितदादांनी बाजी मारली
Sarkarnama December 21, 2025 08:45 PM
Saswad Nagar Parishad electoin live: प्रभाग दोन मध्ये कोण आघाडीवर? सासवड

सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २ मधील दिनेश भिंताडे ,लिना वढणे प्रभाग क्रमांक ९ मधील प्रदीप राऊत, प्रियंका जगताप भाजपचे उमेदवार विजयी झाल्या आहेत.

Ausa Nagar palika electoin live: राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार विजयी

औसामध्ये भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार विजयी झाले आहे.

Karad Nagar palika Election result LIVE : राजेंद्रसिंग यादव हे आघाडीवर

कराड नगरपालिकेच्या मतमोजणीत पहिली फेरी पूर्ण झाली असून त्यामध्ये यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीचे नगराध्यक्ष पदाची उमेदवार राजेंद्रसिंग यादव हे आघाडीवर आहेत

Ratnagiri nagar palika election result LIVE : शिवसेनेचे जागृती पिळणकर आणि राकेश नागवेकर विजय

रत्नागिरी

प्रभाग 12 मधील शिवसेनेच्या उमेदवार जागृती पिळणकर आणि राकेश नागवेकर यांचा पहिला निकाल जाहीर झाला असून ते विजयी झाले आहेत

Latur Nagar palika election result LIVE : राष्ट्रवादीचे चार उमेदवार विजयी लातूरच्या उदगीरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ उमेदवार विजयी झाले आहेत. Udgir Nagar palika election 2025: उदगीर नगरपालिका कोण आघाडीवर?

पहिली फेरी

राष्ट्रवादी ०८

भाजप ००, काँग्रेस ००, एमआयएम ०० शिवसेना ००

नगराध्यक्ष पदासाठी भाजप आघाडीवर

Nandgaon Nagar Parishad Live: नांदगांव नगरपरिषद निकाल

पहिल्या फेरी अखेर शिवसेनेचे सागर हिरे 1619 मतांनी आघाडीवर

राजेश बनकर : 1817

सागर हिरे : 3436

Saswad Municipality election result LIVE: नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जगताप या आघाडीवर

सासवड नगरपालिका

24 सदस्य संख्या आणि 1 नगराध्यक्ष आहे

22 उमेदवारांसाठी मतमोजणी आहेत.

2 बिनविरोध झाले आहेत.

भाजपच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार जगताप या आघाडीवर

भोरमध्ये भाजपची आघाडी, उमेदवारांकडून गुलाल उधळणीला सुरुवात

इंदापूर मध्ये सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार असलेले प्रदीप कंद पिछाडी वर

अजित पवारांच्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा आघाडीवर

Malvan Nagar palika election result LIVE: मालवण नगरपालिका निवडणूक निकाल

मालवण नगरपालिका निवडणूक निकाल

पहिल्या फेरीत नगराध्यक्ष पदासाठी ममता वराडकर १७२ मतांनी आघाडीवर

पूजा करलकर 689

शिल्पा खोत - 809

ममता वराडकर 981

Vadgaon Maval Nagar palika election result LIVE: वडगाव मावळ मध्ये भाजपची आघाडी

भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आघाडीवर आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्विनी कथले 832 मतांनी पुढे आहेत.

kolhapur Nagar Palika Nivdnuk Nikal Live: शिरोळ नगराध्यक्षपदासाठी योगिता कांबळे २१५९ मताने आघाडीवर

कुरुंदवाड नगरपालिकेत यड्रावकर गटाच्या मनीषा डांगे पहिल्या फेरीत 1184 मतांनी आघाडीवर आहेत. शिरोळ नगराध्यक्ष योगिता कांबळे २१५९ मताने आघाडीवर आहे

मलकापूरचे माजी नगराध्यक्ष शामराव कारंडे पराभूत .पहिल्या फेरीत जनसुराज्याच्या रश्मी कोठावळे ४४ मतांनी आघाडीवर

Nandurbar Nagar palika election result LIVE: नंदूरबार नगरपालिका मजमोजणीस सुरवात

नंदुरबार नगरपालिकेसाठी 11 फेऱ्या, शहादा नगरपालिकेसाठी 5 फेऱ्या नवापूर नगरपालिकेसाठी 6 फेऱ्या आणि तळोदा नगरपालिकेसाठी 7 फेऱ्या होणार आहेत..

Murgood Nagar palika election result LIVE:मुश्रीफ गटाला धक्का बसला

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड नगरपालिकेचा पहिला निकाल हाती आला आहे. मुरगूड मध्ये मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. पहिल्या फेरीत माजी खासदार संजय मंडलिक यांच्या शिवसेना भाजपचे ४ चार उमेदवार आघाडीवर आहेत.

Sillod Nagar Panchayat Election: सिल्लोडमध्ये शिवसेनेचा उमेदवार आघाडीवर

छत्रपती संभाजीनगर सिल्लोडमध्ये शिवसेनेचे समीर अब्दुल सत्तार पोस्टल मतमोजणीत आघाडीवर आहेत.

Kagal Election Result : कागलमध्ये निवडणुकीपूर्वी अभिनंदनाचे बॅनर झळकले

कागलमध्ये निवडणुकीपूर्वी अभिनंदनाचे बॅनर झळकले असून निवडणूक निकालापूर्वी लावलेल्या बॅनरवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.निवडणुक आयोगाने बॅनर लावणारांना आधीच निकाल सांगितला आहे का? असा एका उमेदवारांकडून सवाल करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे का असा सवाल करत, पोलीस प्रशासनानं या बॅनरवर कारवाई कारवाई करायला हवी, अशी मागणी उमेदवारांकडून मागणी केली जात आहे.

NagarParishad Nivdnuk Nikal Live : अखेर तो क्षण आला! नगरपालिका, नगरपंचायतींच्या मतमोजणीला सुरूवात

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील जनतेचं ज्या निकालाकडे डोळे लागले होते अखेर तो क्षण आता आला असून राज्यभरातील २८८ नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

Ishwarpur Nagar Parishad Live : ईश्वरपूर नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ

नाष्ट्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे असं सांगत एक व्यक्ती स्ट्राँग रुमच्या दिशेने गेल्याने ईश्वरपूर नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झाला आहे. सदर व्यक्ती स्ट्राँग रुमच्या दिशे जाण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना हा व्यक्ती स्ट्राँग रुमकडे गेला कसा? असा सवाल मविआच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी उपस्थित केला आहे.

फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी पार पडणार

फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेसाठी आज मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्रावर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मतमोजणीदरम्यान उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने फुरसुंगी आणि उरुळी देवाची परिसरातही जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Pune Local Body Election Live Updates : 9 वाजून 30 मिनिटांनी स्ट्रॉंग रूम उघडल्या जाणार

भोर नगरपरिषदेची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. 9 वाजून 30 मिनिटांनी स्ट्रॉंग रूम खोलले जाणार आहेत. तर सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 5 टेबलवर 5 फेऱ्या मतमोजणी होणार यापैकी एक टेबल हा टपाली मतदान मोजणीसाठी असणार आहे.

Solapur Local Body Election Live : सोलापुरात भाजपचा विजय निश्चित - जयकुमार गोरे

सोलापुरात भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित होणार, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.

Akkalkot Live Result Update : अक्कलकोटमध्ये निकालाआधीच भाजपकडून फटाक्यांची आतषबाजी

नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या मजमोजणीला अद्याप सुरूवात झाली नाही. मात्र, याआधीच अक्कलकोटमध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी आणि बॅनरबाजी करण्यात येत आहे.

Beed Election Result Live : बीड जिल्ह्यातील 6 नगरपरिषदेच्या निवडणुकांची आज मतमोजणी

बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या निवडणुकांची आज मतमोजणी असून यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, आंबेजोगाई, परळी नगर परिषदांचे निकाल जाहीर होणार आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 400 अंमलदार आरसीबी आरसीएफ पोलिसांचा मोठा फौज फाटा तैणात करण्यात आला.

Angar Nagar panchayat result Live : अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषित करण्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

निकालाआधीच मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषित करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून याबाबतचं राज्य निवडणूक आयोगाचं पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना आलं आहे. त्यानुसार आज सकाळी जिल्हाधिकारी अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याची घोषणा करणार आहेत. तर या नगरपंचायतीत नगराध्यक्ष आणि १७ सदस्यपदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे.

Kolhapur : महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

काँग्रेसला 75, ठाकरे सेनेला 5 तर शरद पवार गटाला एक जागा? काँग्रेसकडून घटक पक्षांसोबत केवळ जिंकून येणाऱ्या जागांवरच चर्चा. महाविकास आघाडीच्या समितीच्या बैठकीत काँग्रेसकडून घटक पक्षांना प्रस्ताव कोल्हापुरात ठाकरे सेनेला केवळ पाच जागांवर मानावे लागणार समाधान? तर शरद पवार गटाला केवळ एकच जागा, महाविकास आघाडीच्या या फॉर्म्युल्यानंतर इच्छुकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता.

NagarPalika Nivdnuk Nikal Live : निकालापूर्वी तीन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि न्यायालयाच्या आदेशांनंतर घेण्यात आलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. एकीकडे राज्यरातील निकालाची प्रतिक्षा असताना निकालापूर्वीच तीन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जामनेरच्या नगराध्यक्षपदी तर भाजपचे नयनकुंवर रावल दोंडाईचा नगराध्यपदी आणि बहुचर्चित अनगरच्या नगराध्यक्षपदी भापच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

NagarPalika Nivdnuk Nikal Live : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार

राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर सर्वांना ज्या दिवसाची प्रतिक्षा होती तो निकालाचा अखेर आज आला आहे. राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी थोड्या वेळात सुरू होणार असून दुपारपर्यंत सर्व निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तब्बल 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींची निवडणूक अखेर पार पडली. 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर अशा 2 टप्प्यांत या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यानंतर आज (21 डिसेंबर) रोजी मतमोजणी होणार आहे. यात आता कोण बाजी मारणार? कोण गुलाल उधळणार? आणि कोणाच्या पदरी पराभव येणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.