Nashik Property Expo : नाशिकमध्ये घरांची चांदी! 'होमेथॉन २०२५' मध्ये तीन दिवसांत १०० कोटींची उलाढाल
esakal December 22, 2025 11:45 AM

नाशिक: ‘नरेडको’ आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो-२०२५’मध्ये शनिवारी (ता. २१) तिसऱ्या दिवसापर्यंत २०३ फ्लॅटचे बुकिंग झाले असून, जवळपास १०० कोटींची उलाढाल यातून झाली. रविवारी (ता. २१) प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. हा एक्स्पो केवळ घरखरेदीचा मंच न राहता नाशिकच्या शाश्वत विकासाचा, पर्यावरण संवर्धनाचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे या तीन दिवसांत स्पष्ट झाले.

डोंगरे वसतिगृह मैदानावरील या प्रदर्शनात घरखरेदी, गुंतवणूक, आधुनिक जीवनशैली आणि पर्यावरणपूरक विकास यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. फ्लॅट्स, प्लॉट्स, व्यावसायिक मालमत्ता, गृहकर्ज, इंटिरिअर डिझाइन, स्मार्ट होम सोल्यूशन्स आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी यांसारख्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

प्रदर्शनातील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. १२.५२ कोटी रुपयांची किंमत असलेला सर्व सुखसुविधांनी युक्त आलिशान फ्लॅट, तसेच मुंबईप्रमाणे नाशिकमध्ये ४५ मजल्यांपर्यंत बांधकाम असलेल्या गोविंदनगर, गंगापूर रोड, नवश्या गणपती, सोमेश्वर परिसरातील इमारती ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या.

‘नरेडको’च्या माध्यमातून काही समाजसेवी संस्थांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. त्याचबरोबर ‘हरित नाशिक’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी प्रदर्शनाला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येइतकी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दीपक बिल्डर अॅन्ड डेव्हलपर्स टायटल स्पॉन्सर म्हणून, तर एबीएच डेव्हलपर्स आणि ललित रूंगटा ग्रुप को-पॉवर्ड बाय म्हणून या प्रदर्शनासोबत जोडले गेले. जॅग्वार अॅन्ड सिरॅमिक ट्रेडर्स, द व्हीआर कंपनी आणि बीएसएनएल यांचाही मोलाचा सहभाग लाभला.

मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, माजी अध्यक्ष अभय तातेड, अध्यक्ष सुनील गवांदे, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांच्यासह भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, मुकुंद साबू, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनवणे, शशांक देशपांडे आदी सदस्यांनी आयोजनासाठी योगदान दिले.

श्रुती मराठेंची उपस्थिती आकर्षण

नरेडको नाशिक आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ ला विशेष आकर्षण ठरली ती ब्रँड अम्बेसिडर आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठे यांची उपस्थिती. या वेळी आयोजित विशेष कार्यक्रमात भूषण मटकरी यांनी श्रुती मराठे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी घर, स्वप्न, संघर्ष व स्थायिक होण्याचा अनुभव अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी शब्दांत मांडला.

बुकिंगवर प्रत्येकाला चांदीचे नाणे भेट

अवघ्या तीन दिवसांत सुमारे ३२ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली; तर २०३ जणांनी प्रत्यक्ष बुकिंग करीत घरखरेदी निश्चित केली. प्रत्येक बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला ‘नरेडको’तर्फे १० ग्रॅम चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले. या प्रदर्शनातून तीन दिवसांत १०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सचिव शंतनू देशपांडे यांनी दिली.

Madhya Pradesh Tourism: कमी बजेट मध्ये नववर्षाचे पर्यटन! मध्य प्रदेशातील हे ३ ऑफबीट स्पॉट्स का आहेत ट्रेंडमध्ये?

आज विशेष चर्चासत्र

होमेथॉन २०२५ च्या शेवटच्या दिवशी, रविवारी नाशिकच्या विकासावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात नाशिकमधील तिन्ही आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि ॲड. राहुल ढिकले यांच्यासह ‘नरेडको’चे पदाधिकारी शहराच्या भविष्यातील विकासदृष्टीवर चर्चा करतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.