पुणे : सायबर चोरट्यांकडून फसवणूक झाल्याप्रकरणी शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये सायबर चोरांनी एक कोटी ६१ लाख ९८ हजार ९५२ रुपयांची फसवणूक केली.
वारजे परिसरातील ४४ वर्षीय तक्रारदाराची शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत १६ लाख २१ हजारांची फसवणूक केली. हा प्रकार १४ डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२४ दरम्यान घडला. बेगाव बुद्रुक येथील ३५ वर्षीय तरुणीची सायबर चोरांनी एक लिंक पाठवत पाच लाख ३९ हजार ८९७ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ७ ते ११ जुलैदरम्यान घडला.
कोथरूड परिसरातील ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी ११ लाख ६७ हजार ५५८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार २५ जुलै ते २८ ऑगस्टदरम्यान घडला.
कोथरूड येथील ५५ वर्षीय महिलेची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान घडला. शिंदे वस्ती येथील ३८ वर्षीय इसमाची सायबर चोरांनी पाच लाख ६१ हजार २५६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
वडगाव शेरी येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सिंहगड रस्ता परिसरातील ३३ वर्षीय महिलेची सायबर चोरांनी ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली तीन लाख ५० हजार ५४० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार आठ आणि नऊ डिसेंबरला घडला.
Pune Cyber Fraud : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी ११ गुन्ह्यांची नोंद; दोन कोटी १६ लाखांची ऑनलाइन लूट!हिंगणे परिसरातील ४९ वर्षीय महिलेची शेअर बाजाराच्या नावाखाली ११ लाख ६५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार १४ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला. धायरी येथील २३ वर्षीय युवकाची हॉटेल रेटिंग आणि ट्रेडिंगच्या आमिषाने ३ लाख ४ हजार १०० रुपयांची फसवणूक केली. धानोरी येथील ३९ वर्षीय तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली २७ लाख ८० हजार ९५७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.