Latest Marathi News Live Update : उद्यापासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार
esakal December 23, 2025 12:45 AM
Mumbai News: उद्यापासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार

उद्यापासून निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु ही प्रक्रिया सुरू होण्याआधी निवडणूक कार्यालय उभारण्याची धावपळ सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे त्यात भांडुप एस प्रभागाअंतर्गत येणाऱ्या दहा प्रभागांसाठी कार्यालय विक्रोळी कन्नमवार शाळा क्रमांक एक दाखविण्यात येत होते. त्यानंतर अचानक यामध्ये बदल करून एस वॉर्ड मध्ये कार्यालय बनविण्यात येत आहे. रात्रीपर्यंत तरी या ठिकाणी कार्यालय बनविण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची धावपळ दिसून येत होती. त्यामुळे उमेदवारी अर्ज नेमका कुठे भरावा यासंदर्भात उमेदवार देखील सभ्रमात आहेत.

Kolkata News: कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयावर मोर्चा

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी इतर भाजप नेत्यांसोबत या क्रूरतेच्या आणि हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयावर मोर्चा काढला.

Mumbai News: विक्रोळी पार्कसाईट परिसरात गुरखा घालून फिरणाऱ्याला व्यक्तीला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले

विक्रोळी पार्कसाईट पोलीस स्टेशन हद्दीत आज रोजी सकाळी 11:30 वाजता च्या दरम्यान एक व्यक्ती बुरखा घालून फिरत असल्यामुळे काही स्थानिक लोकांनी त्यास पकडून मारहाण केली व त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर इसमाची चौकशी केली असता त्याचे नाव तौसीफ मोहमदिन शेख वय 33 वर्ष धंदा रिक्षा चालक, राहणार चंद्रभागा सोसायटी रूम नंबर 572 पार्कसाईट हा असून तो त्याच हद्दीत रिक्षा चालवतो दोन दिवसापूर्वी त्याने त्यांच्या रिक्षात काही लोकांना बसून आणून आनंद गड नाका येथे सोडले होते व तेथे त्यांच्याशी वाद झाल्याने व त्यांनी त्याचे भाड्याचे पैसे दिले नव्हते.

US Embassy in India tweet: भारतातील अमेरिकन दूतावासाचे ट्विट व्हायरल

भारतातील अमेरिकन दूतावासाने ट्विट केले आहे की, "१५ डिसेंबरपासून, परराष्ट्र विभागाने मानक व्हिसा तपासणीचा भाग म्हणून सर्व H-1B आणि H-4 अर्जदारांसाठी ऑनलाइन उपस्थितीच्या पुनरावलोकनाचा विस्तार केला आहे. ही तपासणी H1-B आणि H-4 व्हिसासाठी सर्व राष्ट्रीयत्वांच्या सर्व अर्जदारांसाठी जागतिक स्तरावर केली जात आहे. H-1B कार्यक्रमाचा गैरवापर रोखण्याचा हा एक प्रयत्न आहे, त्याच वेळी कंपन्यांना सर्वोत्तम तात्पुरत्या परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी दिली जात आहे. अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावास H-1B आणि H-4 नॉन-इमिग्रंट व्हिसा अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे सुरूच ठेवतील. आम्ही अर्जदारांना शक्य तितक्या लवकर अर्ज करण्यास प्रोत्साहित करतो आणि या व्हिसा प्रकारांसाठी अतिरिक्त प्रक्रिया वेळ लागेल अशी अपेक्षा आहे."

Husain Dalwai: लोकांना जागरूक करण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत - दलवाई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालांवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई म्हणाले, "निवडणुकांमध्ये किती भ्रष्टाचार होतो, हे सर्वांनाच माहीत आहे, मतचोरी करण्यापासून ते लाच देण्यापर्यंत, आणि त्यानंतर गरिबांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. लोकांना जागरूक करण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत, ही आमचीच चूक आहे. आपण आपली संघटना मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे."

Nanded Live: नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण आणि सुटका

नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे चार चाकी वाहनातून सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. त्यांना बेदम मारहाण झाली असून नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपहरणाचे कारण अस्पष्ट आहे.

Nagpur Live: बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना विरोधात विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक

बांगलादेशमधील धर्मांध शक्तीचा विरोध करण्यासाठी प्रतिकत्त्मक पुतळा जाळण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना विरोधात विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले असून नागपूरातील व्हेरायटी चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बांगलादेशचा झेंडाही जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी थांबविल.

Jalgaon Live: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ

जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल 14 हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 11 हजार 150 रूपयांच्या विक्रमी उच्चांकीवर पोहोचले आहेत. सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने दोन लाख 11 हजार रुपयांचा आकडा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात देखील 1 हजार 800 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर जीएसटीसह सह 1 लाख 37 हजार 299 रूपयांवर पोहोचले आहे.

Jalna Live: जालन्यात पैशाच्या वादातून तरुणाची गोळी झाडून हत्या

जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यात पैशाच्या वादातून एका 30 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. सागर धानोरे असं मयत तरुणाचं नाव आहे. दरम्यान या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हत्या करून आत्महत्येचा बनाव केला होता मात्र पोलिसांच्या तपासामध्ये ही आत्महत्या नसून हत्या असल्याच उघडकीस आल आहे.

देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला- चंद्रशेखर बावनकुळे

देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला, चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व नेत्यांनी मेहनत घेतली. आम्ही 51 टक्के मतं मिळाली.. दोन तृतीयांश जागा मिळाला येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदेमध्ये आम्ही 2/3 जागा जिंकू असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

pune live : भाजप पाठोपाठ पुण्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची सुद्धा आज बैठक

निलम गोऱ्हे, विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत होणार बैठक

शिवसेनेत प्रवेश केलेले आबा बागुल सुद्धा राहणार उपस्थित

बैठकीत पुणे महापालिकेच्या विषयी आणि जागांच्या बाबत केली जाणार चर्चा

malkapur live : मुंबई नागपूर हायवेवर भिषण अपघात, तिघे जागीच ठार, दोन जण गंभीर..

मुंबई नागपूर हायवेवर मालकापूर नजीक कारवरील नियंत्रण सुटल्याने भिषण अपघात झालंय, या अपघाता कार मधी तिघेजण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे

Nashik live : नाशिक महानगरपालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

नाशिक महानगरपालिका ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

- लवकरच नाशिकमधील मनसे सेना युतीची घोषणा होणार

- नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयात मनसे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक

- नाशिक महानगरपालिकेच्या जागा वाटपासंदर्भात झाली बैठक

CM Devendra Fadnavis: विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले, भाजप पक्ष एक नंबर ठरला - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, "कालच्या महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. महायुतीने ७५% नगरपरिषद अध्यक्षांना निवडून आणले आहे. महाविकास आघाडीचे एकूण ५० अध्यक्ष निवडून आले, तर महायुतीचे २१० अध्यक्ष निवडून आले. आम्ही महाविकास आघाडीला पूर्णपणे नेस्तनाबूत केले आहे. भाजपचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे. निवडून आलेल्या अध्यक्षांपैकी ६५% आमच्या पक्षाचे आहेत. या वर्षी आमचे जवळपास ३००० नगरसेवक निवडून आले आहेत. एकूण निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ४८% भाजपचे आहेत. हा एक विक्रम आहे. जनतेने आमच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे... जनतेने मोदींच्या विकास आणि विश्वासाच्या राजकारणाला प्रतिसाद दिला आहे. नागपूरमधील विरोधकांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले आहेत. आम्ही सावनेर नगरपरिषद काँग्रेसमुक्त केली आहे... येत्या काळात आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकू."

गृह विभागाचे एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टरमधून एका दात्याच्या हृदयाचे दान

गृह विभागाचे एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमधून एका दात्याचे हृदय एर्नाकुलम जनरल हॉस्पिटलमध्ये पोहोचवत आहे. हे हृदय कोल्लम जिल्ह्यातील चिराक्करा, इडावट्टम येथील रहिवासी असलेल्या शिबू (४७) यांचे आहे, ज्यांना रस्ते अपघातानंतर ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. अवयवदान प्रक्रियेचा भाग म्हणून, हे हृदय एर्नाकुलम जनरल हॉस्पिटलला देण्यात आले आहे. एक मूत्रपिंड तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजला, डोळे तिरुवनंतपुरम येथील प्रादेशिक नेत्रविज्ञान संस्थेला, यकृत अमृता हॉस्पिटलला आणि दुसरे मूत्रपिंड कोल्लम येथील त्रावणकोर मेडिकल कॉलेजला दान केले जात आहे. देशात पहिल्यांदाच जिल्हास्तरीय रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जात आहे.

Mumbai News: जगातील सर्वात मोठ्या जगदंबा तलवारीच्या प्रतिकृतीचं राम कदम यांच्या हस्ते लोकार्पण

जगातील सर्वात मोठ्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती घाटकोपरच्या संघानी गार्डनमध्ये साकारण्यात आलेली आहे. भाजप आमदार राम कदम यांच्या हस्ते या तलवारीचं लोकार्पण करण्यात आलं. 17 फूट उंचीची जगदंबा तलवार असून गीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मिळालेल्या भरघोस यशानंतर भवानी तलवारीचे लोकार्पण करून हा विजयोत्सव राम कदम यांनी साजरा केला आहे.

Nashik News: लासगाव येथील विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवर चोरी

लासगाव (ता.पाचोरा) येथील बांबरुड (राणीचे) येथील रस्त्यावरील विज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवरील सप्टेंबर महिन्यात बसवण्यात आलेल्या शेती पंपासाठी च्या नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम हैद्राबाद येथील एन.सी.सी.कंपनीने घेतले आहे.सर्वात आधी सप्टेंबर महिन्यात संबंधित ठेकेदारांनी ५०० के.व्ही.चा ट्रान्सफॉर्मर बसवला होता.या ठिकाणी सबठेकेदार गेल्या आठवड्यापासून श्री निवास इलेक्ट्रीशयन चे मजूर कामासाठी आलेले आहेत.

Kalyan Live: कल्याणमध्ये उबाठा गटात तुंबळ हाणामारी

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक संदर्भात कार्यकर्त्यांची मुलाखत सुरू असताना आपापसात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण शहाड शाखा प्रमुख निशिकांत ढोणे यांना मारहाण झाली. तर ढोणे यांनी भागवत बैसाने यांना देखील मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. दोघे जखमी झाले असून,दोघांनीही एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली

Pune : पुण्यात आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार

पुण्यात आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार

चंद्रकात पाटील यांच्या निवासस्थानी असणार बैठक

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी होणार बैठक

शिवसेनेकडून दिलेल्या प्रस्तावावर भाजप नेत्यांमध्ये आज चर्चा होण्याची शक्यता

प्रभाग निहाय उमेदवार, पुढील रणनीती वर चर्चा होणार

Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकात बैठक सुरू

- बैठकीला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले उपस्थित

- मनपा निवडणुकीतील उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू

- हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे बैठकीला सुरुवात

Nagpur Live : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी विजयी उमेदवारांचा सत्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार

मुख्यमंत्री शासकीय निवस्थान रामगिरी बाहेर विजयी उमेदवार, कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात

नागपूर जिल्ह्यातील 27 पैकी 22 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश

महसूलमंत्री बावनकुळे देखील यावेळी उपस्थित राहणार..

Ahilyanagar Live : नगराध्यक्ष होताच हातात झाडू घेऊन मैथिली तांबे उतरल्या थेट संगमनेरच्या रस्त्यावर

संगमनेर नगरपालिकेत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच संगमनेर स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे.. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी मैथिली तांबे या सासु दुर्गा तांबे यांच्या समवेत हातात झाडू घेऊन संगमनेरच्या रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले.. सहकारी महिला नगरसेविका आणि महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांंसमवेद मैथिली यांनी बस स्थानक परिसर स्वच्छ करून कामाला सुरुवात केली..येणाऱ्या काळात स्वच्छतेच्या बाबतीत संगमनेर अग्रेसर ठेवण्याचा निर्धार केला असल्याचं मैथिली तांबे यांनी म्हटलंय..

Mumbai LIve: संजय राऊतांची राज ठाकरेंशी भेट; शिवतीर्थवर २० मिनिटांची चर्चा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी झाली असून, सुमारे २० मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Mumbai Live : संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला आले आहे. शिवसेना-मनसे युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. संजय राऊत राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गेले आहेत.

Bhimashankar Mandirliveupdate : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद राहणार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील तीन महिने दर्शनासाठी बंद राहणार आहे. १ जानेवारीपासून पुढील तीन महिने भीमाशंकर मंदिर बंद राहणार आहे. पुढील वर्षाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे विकास आराखड्यातून नव्या विकास कामांची सुरुवात होत आहे. मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे काम होणार असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी मुख्य मंदिर तीन महिने दर्शनासाठी बंद राहणार आहे. भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांत यासाठी प्रशासकीय पातळीवर पाहणी करून नियोजन केले जाणार आहे.

Sillod Live update: सिल्लोडमधील विजयानंतर अब्दुल सत्तारांची रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल

नगरपरिषदेच्या निकालानंतर अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. सत्तार म्हणाले की, सिल्लोडमध्ये प्रचार करणाऱ्यांना आम्ही भोकरदनमध्ये पराभूत केले. स्वतःचं गाव सांभाळू न शकणारे सिल्लोडमध्ये प्रचार करत होते, असा टोला सत्तार यांनी दानवेंना लगावला. फुलंब्री आणि कन्नडमध्येही आम्ही भाजपचे गणित बिघडवले, असे सत्तार म्हणाले. विशेष म्हणजे, भोकरदन हे रावसाहेब दानवेंचे गृहनगर असून, कन्नडमध्ये त्यांची मुलगी संजना जाधव भाजपच्या आमदार आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे असा राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.

Sanajy Raut Live : महायुतीचा कालचा निकाल हे नाटक, आयोगाची सत्ताधाऱ्यांना जिंकवण्यासाठी मदत- संजय राऊत

काल शो हाऊसफुल्ल नव्हता, आयोगाने सत्ताधाऱ्यांना जिंकवण्यासाठी मदत केली अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

Delhi Live : सोमवारीही दिल्लीत विषारी हवेचा प्रभाव कायम, अनेक भागात AQI ४०० पेक्षा जास्त

दिल्लीतील धुरामुळे आज दृश्यमानतेवर परिणाम झाला. एम्सच्या आसपासच्या हवेत विषारी धूर स्पष्टपणे दिसत होता. CAQM (कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट) ने दिल्ली-एनसीआर प्रदेशात GRAP स्टेज-IV अंतर्गत सर्व कृती सुरू केल्या आहेत.

Kolhapur Municipal Corporation Elections : 'राष्ट्रवादी'ने पाठविला पक्षनिरीक्षकांना अहवाल

कोल्हापूर : ‘आमचा पक्ष इंडिया आघाडीतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही २१ जागांची मागणी जिल्ह्यातील आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचा आणि आमच्या पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या आणि मुलाखत दिलेल्या उमेदवारांची नावे असलेला अहवाल प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, पश्चिम महाराष्ट्राचे पक्ष निरीक्षक जयंत पाटील यांच्याकडे पाठविला असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आज सांगितले.

Jammu Police : चिनी बनावटीची दुर्बीण पोलिसांनी केली जप्त

जम्मू : शस्त्रावर बसवता येणारी चिनी बनावटीची दुर्बीण पोलिसांनी जप्त केली असून, सांबा जिल्ह्यातील २४ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘जम्मू (ग्रामीण) पोलिसांनी सिध्रा भागातून शस्त्रावर बसवता येणारी एक दुर्बीण जप्त केली आहे,’ असे एका पोलिसांनी सांगितले. पोलिस; तसेच ‘स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप’ची पथके या प्रकरणाची पुढील चौकशी करीत आहेत. दरम्यान, दुसऱ्या घटनेत सांबा जिल्ह्यातील दियाणी गावातून तनवीर अहमद याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.

Ajit Pawar : अजित पवार यांच्या आज पुण्यात विविध बैठका

पुणे : अजित पवार यांच्या आज पुण्यात विविध बैठका होत आहेत. बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत शहर पातळीवर, तसेच पिंपरी चिंचवड विषयी संदर्भात बैठक होणार आहे. पुणे शहरातील इच्छुक उमेदवार, तसेच पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी अजित पवार यांची भेट घेणार आहे.

Gruhalakshmi Yojana : 'गृहलक्ष्मी'चा २४ वा हप्ता आजपासून जमा होणार, मृत लाभार्थ्यांसाठी नवीन सॉफ्टवेअर

बंगळूर : आज (ता. २२) पासूनच राज्यातील १.२६ कोटी गृहलक्ष्मी लाभार्थी महिलांच्या खात्यांत गृहलक्ष्मी योजनेचा एक हप्ता उद्यापासून जमा केला जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. मृत लाभार्थ्यांची यादी तपासण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Bangalore News : संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याला अटक, बंगळूरस्थित कंपनीकडून घेतली लाच

बंगळूर : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात नियुक्त असलेले अधिकारी लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा आणि विनोद कुमार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे, अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणेच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी दिली. बंगळूर येथील एका खासगी कंपनीकडून तीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी सीबीआय अधिकाऱ्यांनी शर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची झडती घेत २.२३ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

President Draupadi Murmu : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

नवी दिल्ली : मनरेगा योजनेचे नाव बदलण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या ‘विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन’ (व्हीबी जी राम जी) या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या तीव्र विरोधानंतरही सरकारने हे विधेयक पुढे रेटले होते. सरकारने नाव बदलण्यासोबत कायद्यात अनेक सुधारणा केल्या आहेत.

Bangladesh News बांगलादेशात हिंदू व्यक्तीच्या हत्येप्रकरणी दोघे जण ताब्यात

ढाका : बांगलादेशमध्ये हिंदू व्यक्तीच्या हत्येप्रकरणी आज आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्राने बांगलादेश पोलिसांच्या हवाल्याने दिले आहे. दिपूचंद्र दास (वय २५) यांना गुरुवारी बालुका भागात तथाकथित ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने मारहाण करून ठार मारले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता.

Municipal Council-Nagar Panchayat Election Results : नगरपरिषद-नगरपंचायतीच्या निवडणुकीत २८८ पैकी १२९ नगराध्यक्षपदे मिळवत भाजप ठरला सर्वांत मोठा पक्ष

Latest Marathi Live Updates 22 December 2025 : वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निकालांची पुनरावृत्ती रविवारी जाहीर झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक निकालात पहायला मिळाली. महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागलेल्या या निकालात महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला. या निवडणुकीत २८८ पैकी १२९ नगराध्यक्षपदे मिळवत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांनाही चांगले यश मिळाले. तसेच मनरेगा योजनेचे नाव बदलण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेल्या ‘विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन’ (व्हीबी जी राम जी) या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. ‘शिक्षणात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.