Vastu Shastra : जेवताना कधीच या चुका करू नका, अन्यथा कंगाल झालाच म्हणून समजा
admin December 23, 2025 02:46 AM
[ad_1]

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? याबद्दल तर मार्गदर्शन करण्यात आलचं आहे. मात्र सोबतच आपण अनेकदा अशा छोट्या-छोट्या चुका करतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक संकटं तुमच्यावर येऊ शकतात. जसं की अचानक धनहानी होते, घरात काहीही कारण नसताना भांडणं होतात. आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.  यामागे अनेकदा तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो. हा वास्तूदोष दूर कसा करायचा? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तुम्ही जर वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय केल्यास तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये जेवणाच्या पद्धतीला देखील खूप महत्त्व आहे. आपण अनेकदा चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या दिशेला तोंड करून जेवतो, त्यामुळे अन्नपूर्णा माता अप्रसन्न होते. घरात वास्तूदोष निर्माण होतो. जेवताना दिशा नेहमी योग्य असावी,  जेवणापूर्वी शरीराची स्वच्छता महत्त्वाची असते, त्यामुळे हात पाय तोंड धुवूनच जेवण करण्यास बसावे असं वास्तुशास्त्र सांगतं. तसेच जेवताना तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत, जर जेवताना मनात नकारात्मक विचार येत असतील तर त्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर आणि मनावर होतो, तसेच तुम्ही मनामध्ये जे चिंतंन करत असतात ते तुमच्यासोबत घडण्याची शक्यता असे असं देखील वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

जेवणाची दिशा

कधीच दक्षिण दिशेला बसून जेऊ नये, यामुळे घरात गरीब येते.  वास्तुशास्त्रानुसार जेवण हे नेहमी पूर्व दिशेला बसूनच करावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, कारण पूर्व दिशा ही सूर्याची दिशा असते, पूर्व दिशेला बसून जेवल्यामुळे तुम्हाला सूर्याचा पुरेसा प्रकाश मिळतो, तुमचं मन आनंदी राहतं, तसेच मेंदू देखील तल्लख होतो. उत्तर दिशेला तोंड करून जेवणं देखील शुभ मानलं जातं, कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, यामुळे तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या सुटतात असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)


[ad_2]
Source link
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.