Black Garlic vs White Garlic : काळा लसूण की पांढरा लसूण? दोघांत फरक काय… आरोग्यास लाभदायक काय?
GH News December 23, 2025 06:11 PM

Black Garlic vs White Garlic : स्वयंपाक घरात लागणारा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लसूण… प्रत्येक भाजी, आमटीला लसूणमुळे एक विशेष चविष्ट चव येते. पण आपण कोणता लसूण वापतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे… प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असणारा लसूण हा देखील एक सामान्य घटक आहे. काळ्या लसणाबद्दल सर्वांना माहिती आहे, पण तुम्ही काळ्या प्रकाराबद्दल ऐकले आहे का? ते शारीरातील चयापचय सुधारते. काळा आणि पांढरा लसूण

डॉक्टरांचे म्हणणे आहे की,घरगुती पांढऱ्या लसणाचा तीव्र वास आणि रोगाणुरोधी गुणधर्म त्यात असलेल्या अ‍ॅलिसिनमुळे आहेत. अ‍ॅलिसिन पोटासाठी खूप हानिकारक आहे. दुसरीकडे, काळ्या लसणातील अ‍ॅलिसिनचे किण्वन करून अधिक व्यापक आणि सहजपणे चयापचय होणाऱ्या अँटिऑक्सिडंट, एस-अ‍ॅलिल सिस्टीन (एसएसी) मध्ये रूपांतर होते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काळ्या लसणात आढळणारे SAC हे कच्च्या लसणामध्ये आढळणाऱ्या SAC च्या तुलनेत शरीराद्वारे सर्वात सहज शोषले जाते. म्हणूनच, बरेच लोक त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे काळे लसून आहारात समाविष्ट करतात.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की काळा लसूण दाहक-विरोधी आहे. तो आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. तो हृदय आणि यकृताच्या आरोग्यास देखील प्रोत्साहन देतो. कर्करोगासारख्या आजारांशी लढण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

काळा लसूण कोणी खाऊ नये?

ज्यांचे रक्त पातळ आहे त्यांनी त्यांचे सेवन मर्यादित करावं. ज्यांचं सहज पोट खराब होतं त्यांनी देखील काळा लसूण टाळावा. फक्त ट्रेंडी आहे म्हणून तुमच्या आहारात काहीही सामाविष्ट. तुमच्या आहारात काहीही जोडण्यापूर्वी तुम्ही नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.