Maruti Suzuki: एकही रुपया कर न भरता नंबर 1 SUV कशी मिळते? २.६७ लाखांची सूट... शोरूम विसरा, कॅन्टीनमधून कार घेतली तर काय होतं?
esakal December 23, 2025 10:45 PM

ग्राहकांसाठी नववर्षाची खास भेट म्हणून मारुति सुजुकीची विक्टोरिस एसयूव्ही आता कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट (सीएसडी) मार्फत उपलब्ध झाली आहे. यंदाच्या इंडियन कार ऑफ द इयर (आयसीओटीवाय) २०२६ हा सर्वोच्च पुरस्कार मारुति सुजुकी विक्टोरिसने पटकावला आहे. या स्पर्धेत तिने स्कोडा क्यालाकला मागे टाकले होते. आता ही एसयूव्ही सामान्य ग्राहकांसोबतच सैनिक, माजी सैनिक आणि पात्र कुटुंबीयांसाठी सीएसडी कॅन्टीनमधून खरेदी करता येणार आहे. मारुति सुजुकीने डिसेंबर २०२५ पासून विक्टोरिसला सीएसडी यादीत समाविष्ट केले आहे.

१.७२ लाख ते २.६७ लाख रुपयांपर्यंत बचत

सीएसडीमार्फत विक्टोरिस खरेदी केल्यास ग्राहकांना एक्स-शोरूम किंमतीच्या तुलनेत १.७२ लाख ते २.६७ लाख रुपयांपर्यंत बचत होते. याचा अर्थ सैनिकांना ही आघाडीची एसयूव्ही कमी किंमतीत मिळेल. कर सवलतीमुळे एकूण खर्चात मोठी सूट मिळते आणि टॅक्समध्ये जवळपास ५० टक्के कपात होते. ही सुविधा भारतीय सेना, हवाई दल आणि नौदलातील जवान, निवृत्त सैनिक तसेच त्यांच्या पात्र नातेवाईकांना लागू आहे.

Gaganyaan Mission: ड्रोग पॅराशूट पात्रता चाचणी यशस्वी; सुरक्षित लँडिंगसाठी महत्त्वाचे, ‘गगनयान’ची तयारी वेगात मारुति विक्टोरिसच्या सीएसडी किंमती (जीएसटीसह) खालीलप्रमाणे आहेत:

एलएक्सआय व्हेरिएंटमध्ये १.५ लिटर नॉर्मल पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल गियरबॉक्ससह किंमत ८,७७,००० रुपये आहे. व्हीएक्सआय व्हेरिएंटची किंमत ९,८२,००० रुपये आहे. झेडएक्सआय आणि झेडएक्सआय प्लस ही व्हेरिएंट्स सीएसडीमध्ये उपलब्ध नाहीत. झेडएक्सआय (ओ) व्हेरिएंटची किंमत ११,७५,००० रुपये तर झेडएक्सआय प्लस (ओ) व्हेरिएंटची किंमत १३,२३,००० रुपये आहे. ही सर्व व्हेरिएंट्स १.५ लिटर नॉर्मल पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल गियरबॉक्ससह येतात.

सैन्य परिवारांना मोठा फायदा

आजच्या काळात एसयूव्ही खरेदी करणे सामान्य नागरिकांसाठी महागडे असते, परंतु सीएसडीच्या माध्यमातून सैन्य परिवारांना मोठा फायदा होतो. विक्टोरिस ही सुरक्षित आणि आधुनिक एसयूव्ही असल्याने सैनिकांना उत्तम पर्याय मिळाला आहे. या योजनेमुळे विक्टोरिसची विक्रीही वाढण्याची शक्यता आहे.

सीएसडी पात्र ग्राहकांसाठी ही योजना विशेष लाभदायी

सीएसडी पात्र ग्राहकांसाठी ही योजना विशेष लाभदायी ठरते कारण त्यांना नवीन वर्षात नंबर वन कार कमी किंमतीत घरी आणता येते. करात कोणतीही अतिरिक्त रक्कम आकारली जात नाही आणि थेट लाखोंची बचत होते. मारुति सुजुकीने ही सुविधा उपलब्ध करून सैनिकांच्या कुटुंबांना नववर्षाची खरी भेट दिली आहे. देशसेवा करणाऱ्या जवानांना आता ही पुरस्कारप्राप्त एसयूव्ही कॅन्टीनमधून सहज खरेदी करता येईल.

Space Laboratory: शैक्षणिक संस्थात उभारणार ‘अवकाश प्रयोगशाळा’; ‘इन्स्पेस’चा प्रस्ताव, अवकाश तंत्रज्ञानाच्या अनुभवासाठी उपयुक्त
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.