कोल्हापूर : गेल्या ९७ वर्षांपासून जलसिंचनासाठी उपयोगी पडत असलेल्या ऐतिहासिक राजाराम तलावामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाचे वसतिगृह, हनुमाननगर परिसरातील सांडपाणी थेटपणे मिसळत आहे.
त्याचे प्रमाण वाढतच असल्याने हा तलाव मरण यातना भोगत आहे. त्याकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गरम्य परिसरातील हा तलाव सांडपाणी साठवण केंद्र बनून मरणसन्नतेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Ichlkaranji Panchaganga Pollution : ‘सांडपाणी नदीत सोडू नका, नाही तर कारवाई!’ इचलकरंजी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कडक तंबीछत्रपती राजाराम महाराज यांनी सरनोबतवाडी, उचगाव, उजळाईवाडी या गावांतील शेतीसाठी जलसिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी १९२८ मध्ये या तलावाची बांधणी केल्यामुळे या तलावाला राजाराम तलाव म्हणून नाव रूढ झाले.
शहरातील एक निसर्गरम्य, जैवविविधता असलेल्या तलावांमध्ये त्याचा समावेश झाला. लोकप्रतिनिधींसह पाटबंधारे विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका आणि छत्रपती राजाराम तलाव जलतरण मंडळाच्या प्रयत्नातून या तलावाचे गेल्या दहा वर्षांत सुशोभीकरण केले. मात्र, दोन वर्षांपासून या तलावातील पाण्याला प्रदूषणाचे लागलेले ग्रहण अधिक गडद बनत आहे.
Kolhapur panchaganga : शेकडो एकर शेती धोक्यात! पंचगंगेतील रसायनमिश्रित पाण्यामुळे शेतकरी भयभीतउजळाईवाडी परिसरामधील हनुमाननगर, तुळजाभवानी कॉलनी, जे. आर. कॉलनी, दादू चौगलेनगर आणि विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाच्या वसतिगृह परिसरातील सांडपाणी थेटपणे या तलावात मिसळत आहे. पावसाळ्यात ते फारसे जाणवत नाही.
मात्र, हिवाळा सुरू झाल्यानंतर या सांडपाण्याची तीव्रता अधिक स्वरूपात दिसत आहे. तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी जलतरण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. पण, तलावाची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाने वेळीच उपाययोजनांची पावले उचलली नाहीत, तर कोल्हापुराच्या इतिहासाचा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा ठेवा असलेला राजाराम तलाव केवळ नावापुरता उरणार आहे.
नैसर्गिक शुद्धता, जैवविविधता धोक्यातसांडपाणी मिसळत असल्याने या तलावातील पाण्याची नैसर्गिक शुद्धता नष्ट होत आहे. पाण्यावर तरंगते शेवाळ (ग्रीन अलगी) साचत असून, ते काळपट होत आहे. त्याचा थेट परिणाम जलचरांवरही होत आहे. या पाण्यातील ऑक्सिजनची पातळी घटत असल्याने एकूण तलाव परिसरातील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
(पूर्वार्ध)
तलावात वाहने, जनावरे धुणे सुरूचछत्रपती राजाराम तलाव जलतरण मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांचे तलाव परिसर स्वच्छ ठेवण्यात मोठे योगदान आहे. या सदस्यांचे सकाळी सहा ते साडेदहा वाजेपर्यंत तलाव परिसरात लक्ष असते.
तलावाच्या ठिकाणी कोणी वाहने, जनावरे धुवत असेल, तर त्यांना ते रोखतात. मात्र, हे सदस्य तेथून गेल्यानंतर थेटपणे तलावात वाहने आणि जनावरे धुणे सुरू होते. त्याने तलावाच्या प्रदूषणात भर पडत आहे. ते रोखणे अत्यंत आवश्यक आहे.
विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे वसतिगृह आणि उजळाईवाडी परिसरातील हनुमाननगर, दादू चौगलेनगरकडून येणारे सांडपाणी हे मैलामिश्रित आणि दुर्गंधीयुक्त आहे. त्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. त्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सांडपाणी रोखून तलाव वाचविण्यासाठी आमच्या जलतरण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. तलावाच्या प्रदूषणाची तीव्रता लक्षात घेता प्रयत्नांना शासनाची साथ मिळणे गरजेचे आहे.
-मंगेश मोगणे, अध्यक्ष, छत्रपती राजाराम तलाव जलतरण मंडळ