संघर्ष गांगुर्डे, सा टीव्ही प्रतिनिधी
Kalyan Dombivli municipal corporation elections Mahayuti : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे राज्यातील नव्या राजकीय युतीची चर्चा सुरू झाली आहे. पण ही घोषणा होण्याआधीच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीची घोषणा झाली आहे. मंगळवारी रात्री कल्याण डोंबिवली महापालिकेतील महायुतीची स्थानिक पातळीवर महायुतीवर चर्चा झाल्याचे समजतेय. पुढील दोन दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल अन् महायुतीची घोषणा होईल, असे समजतेय. (Maharashtra local body elections political alliance)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून यासाठी सलग बैठका सुरू आहेत. महायुतीतील जागा वाटपाबाबत सकारात्मक वातावरण असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी दिली. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाने चर्चा सुरू असून जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय होईल. येत्या दोन दिवसांत याबाबत ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे, असे आमदार मोरे यांनी सांगितले.
Pune Elections : काँग्रेसला मोठा धक्का, पुण्यातील नेत्याने ४० वर्षांची साथ सोडली, हातात घड्याळ बांधलंकेडीएमसीनिवडणुकीत महायुती एकत्र लढल्यास विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आधीच संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून प्रभागनिहाय आढावा, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे. महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असून, त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे. त्यामुळे केडीएमसी निवडणुकीत महायुतीची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Solapur : माणुसकीला काळिमा! कपड्याला शी लागली, आईच्या बॉयफ्रेंडने ३ वर्षांच्या मुलाचा गळा दाबला