Forest Department Alert Kolhapur : कसबा बावडा येथील वाडकर गल्लीतून आज दुपारी अचानक एक कोल्हा भरवस्तीत आला. काही क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बावड्यात ‘कोल्हा आला रे कोल्हा’चा गलका झाला. हा कोल्हा पंचगंगा नदीला लागून असलेल्या उसाच्या शेतातून वस्तीत आल्याची माहिती आहे. पिंजार गल्लीत या कोल्ह्याने एका रेडकावर हल्ला केला.
उलपे गल्लीतून हा कोल्हा वाडकर गल्लीत आला. सुरुवातीला तो कुत्रा असल्याचे काहींनी सांगितले. पण, त्याची हालचाल आणि वस्तीत आल्याने उडालेली धावपळ पाहून तो कोल्हा असल्याची खात्री झाली. उलपे गल्लीतून तो वाडकर गल्लीत आला. तेथून तो अन्य गल्ली बोळातून फिरून पिंजार गल्लीत गेला.
Sahyadri Tiger: 'ताडोबातील आणखी एक वाघीण सह्याद्रीत'; आईपाठोपाठ मुलीचेही स्थानांतर, चांदोलीच्या सोनरलीत वास्तव्य !या गल्लीत रस्त्यावरच बांधलेल्या एका रेडकाचा त्याने चावा घेतला. तेथून प्रिन्स शिवाजी शाळेच्या मागून तो गोळीबार मैदानाकडे गेल्याचे अनेकांनी पाहिले. पूर्वी बावड्यात बिबट्या आला होता. आज कोल्हा आल्याचे समजताच ‘कोल्हा आला रे कोल्हा’ चा गलका सुरू झाला. काही तरुणांनी त्याच्या मागावर जाऊन त्याला वस्तीतून घालवण्याचा प्रयत्न केला. सायंकाळनंतर हा कोल्हा गायब झाला.