Odisha Christmas Controversy : ख्रिसमस सणाला अवघा एक दिवस उरलेला असताना देशभरात नाताळाशी संबंधित वस्तूंची विक्री जोरात सुरू आहे. फूटपाथवर तसेच छोट्या गिफ्ट शॉप्समध्ये सांताक्लॉजच्या टोप्या, ख्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य आणि सांताक्लॉजचे कपडे मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.
मात्र, ओडिशामध्ये याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. “हे हिंदू राष्ट्र आहे, येथे सांताक्लॉजच्या टोप्या (Santa Claus Hat) विकू नका,” असे म्हणत काही जणांनी फूटपाथवर ख्रिसमसची वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओत नेमकं काय आहे?व्हायरल व्हिडिओमध्ये एक विक्रेता आपण राजस्थानातून ओडिशात आलो असल्याचे सांगताना दिसतो. त्यावर कारमधून उतरलेला कथित गोरक्षक “हे हिंदू राष्ट्र आहे. ओडिशा ही जगन्नाथाची भूमी आहे. येथे सांताक्लॉजच्या टोप्या आणि ख्रिसमसचे साहित्य विकण्याची परवानगी नाही,” असे म्हणत त्याच्यावर ओरडतो.
Namo Express Video : नमो एक्सप्रेसमध्ये तरुणानं विद्यार्थिनीचा स्कर्ट काढला अन्..; अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाई“तुम्ही हिंदू असाल तर ख्रिश्चन समाजाशी संबंधित वस्तू का विकत आहात? कुणाची परवानगी घेऊन येथे बसलात?” असे सवाल करत तो विक्रेत्याला तात्काळ सामान उचलून निघून जाण्याची धमकी देतो. परवानगी असल्यासच फूटपाथवर बसून विक्री करा, अन्यथा इथून निघून जा, असेही तो बजावताना दिसतो.
जगन्नाथाच्या भूमीत ख्रिसमस साहित्याला विरोधव्हिडिओमध्ये “जगन्नाथाच्या भूमीत सांताक्लॉजच्या वस्तू विकू देणार नाही,” असे म्हणत संबंधित व्यक्ती विक्रेत्यांना हुसकावून लावत असल्याचे स्पष्टपणे दिसते. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यावरूनच मोठा वाद निर्माण झाला आहे.
View this post on InstagramA post shared by The Times of India (@timesofindia)
या घटनेवर सोशल मीडियावर तीव्र आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्सनी या कारवाईचे समर्थन करत “मक्का-मदिनामध्ये अशा वस्तू विकण्याची हिंमत कराल का?” असा सवाल उपस्थित केला आहे. तर, अनेकांनी या प्रकारावर टीका करत धार्मिक असहिष्णुतेचा आरोप केला आहे. “अशा कथित भक्तांना पाहून देवही हसत असेल,” अशा शब्दांत काहींनी संताप व्यक्त केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या घटनेचे वृत्त दिले असून, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावर देशभरात चर्चा सुरू झाली आहे.