घरात सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी देवघराला विशेष महत्त्व असतं. मात्र देवाचे फोटो किंवा मूर्ती कुठे आणि कशा पद्धतीने ठेवाव्यात, याबाबत अनेकांना संभ्रम असतो. अशावेळी वास्तुशास्त्रातील काही सोप्या नियमांचे पालन केल्यास घरात सुख-समाधान आणि शुभ वातावरण निर्माण होते. चला तर जाणून घेऊया, घरात देवघर ठेवण्याची योग्य दिशा कोणती आणि घरात देवाचे फोटो कुठे लावावेत यासंबंधी महत्त्वाच्या वास्तु टिप्स.
देवघर ठेवण्याची योग्य दिशा
1. ईशान्य (उत्तर–पूर्व) दिशा सर्वात उत्तम मानली जाते.
2. पर्याय म्हणून पूर्व किंवा उत्तर दिशा देखील चालते.
देवाचे फोटो / मूर्ती कसे ठेवावेत
1. देवाचा फोटो किंवा मूर्ती जमिनीवर ठेवू नये
2. भिंतीला टेकवून ठेवत असाल तर ती भिंत स्वच्छ आणि रिकामी असावी.
3. एकमेकांवर फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत.
4. देवांचे फोटो अतिशय जास्त प्रमाणात ठेवू नका.
कुठे ठेवू नयेत
1. बाथरूमच्या भिंतीला लागून देवघर नसावे.
2. बेडरूममध्ये, विशेषतः पलंगासमोर देवाचे फोटो टाळावेत.
3. स्वयंपाकघरात देवघर ठेवायचे असल्यास गॅसपासून वेगळ्या आणि स्वच्छ जागी ठेवा.
Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही.