डोनाल्ड ट्रम्प यांचे भयंकर कांड, एपस्टीनच्या नव्या फाइल्सने वादळ, आता खैर नाहीच, थेट रहस्य..
GH News December 25, 2025 01:10 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. एपस्टीन फाइल्समोर आल्यापासून जगात खळबळ उडाली. अमेरिकेतील अनेक प्रस्थापितांचे खरे चेहरे पुढे आली असून अगदी लहान वयातील मुलींचे कशाप्रकारे शोषण करण्यात आले हे जगाने अगदी डोळ्यांनी बघितले. डोनाल्ड ट्रम्प यांचेही काही खळबळ उडवून देणारे फोटो पुढे आली आहेत. अगदी कमी वयाच्या मुलींसोबतचे त्यांनी खळबळजनक फोटो व्हायरल झाल्याने अमेरिकेत संतापाची लाट बघायला मिळाली. अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमधून हे उघड झाले आहे की, ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टीनसोबत त्याच्या खाजगी विमानातून आठपेक्षा जास्त वेळा प्रवास केला होता. ही माहिती सुरूवातीला लपवण्यात आली. हेच नाही तर असा दावा केला जात आहे की, एपस्टीन फाइल्समधील काही गोष्टी गायब असून सर्व सत्य अजूनही जगापुढे आले नाहीये.

डोनाल्ड ट्रम्प यांना वाचवण्यासाठी एपस्टीन फाइल्समधील अनेक गोष्टी अजूनही जगापासून लपवण्यात आल्या. ट्रम्प यांच्या आलिशान मार-ए-लागो रिसॉर्टबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ट्रम्प यांच्या आलिशान रिसॉर्टमध्ये फक्त आणि फक्त वेश्यांसाठीच भव्य पार्ट्या आयोजित केल्या जात होत्या, आता या माहितीमुळे अमेरिकेत मोठे वादळ आल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिकेच्या प्रमुख गुप्तचर संस्थांपैकी एक असलेल्या एफबीआयला मिळालेल्या माहितीनंतर, एपस्टीनशी संबंधित एका पार्टीच्या फाईल्स प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. या फाईल्समध्ये असा आरोप करण्यात आला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या मार-ए-लागो हॉटेलमध्ये एका पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते, जी पार्टी जेफ्री एपस्टीनशी संबंधित होती.

कागदपत्रांमध्ये या पार्टीचे वर्णन थेट वेश्यांसाठीची पार्टी करण्यात आले. या पार्टीमुळे मोठे तूफान आले असून डोनाल्ड ट्रम्प यांचे पदही या पार्टीबद्दलच्या कागदपत्रांमुळे धोक्यात आले. न्याय विभागाकडून नव्याने प्रसिद्ध झालेल्या नोंदींमधून दावा समोर आला आहे, ज्यात काही माहिती वादग्रस्त असू शकते. आता पुढे आलेल्या माहितीमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पदही धोक्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.