Latest Marathi News Live Update : संभाजीनगरच्या भाजप कार्यालयात मराठवाड्याच्या पाचही महानगरपालिकेची चर्चा
esakal December 26, 2025 07:46 PM
Ch. Sambhajinagar Live : संभाजीनगरच्या भाजप कार्यालयात मराठवाड्याच्या पाचही महानगरपालिकेची चर्चा

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत.

मराठवाड्यातील पाचही महानगरपालिकेमध्ये युती संदर्भात ते प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत, आज मराठवाड्यातील पाचही महानगरपालिके संदर्भात चर्चा करून तिढा सोडवण्याचा बावनकुळे प्रयत्न करणार आहे. प्रत्येक महानगरपालिके संदर्भात स्वतंत्र चर्चा करणार आहेत. संभाजीनगर सह मराठवाड्यातील पाचही महानगरपालिका संदर्भात अजून पर्यंत युती संदर्भात दोन्ही पक्षांकडून ताठर भूमिका पहायला मिळत आहे त्याच संदर्भात बावनकुळे आज प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून युतीचा तिढा सोडवतील का याकडे लक्ष असेल.

Nashik Live : त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

२ जानेवारी २०२६ पर्यंत VIP दर्शन व्यवस्था असणार बंद

नाताळ आणि वर्षअखेर निमित्ताने लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी

एका भाविकाला दर्शनासाठी लागतोय 3 ते 4 तासाचा वेळ

सामान्य भाविकांना VIP दर्शनामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी देवस्थानकडून व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्याचा निर्णय

दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी मंदिर प्रशासनाकडून मोफत पाणी बॉटल आणि फळांची व्यवस्था

शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी एका खळबळजनक विधानात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आगामी काळात एनडीएमध्ये (NDA) सामील होऊ शकतात. राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते, असे सांगत त्यांनी या शक्यतेने कोणालाही आश्चर्य वाटू नये, असा सूचक इशाराही दिला आहे.

Sambhajinagar Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक रिंगणात; १०० जागा लढवण्याची तयारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीत स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
युतीसाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी स्पष्ट केले.
शहरातील सुमारे 100 जागांवर उमेदवार उभे करण्याची पक्षाची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Rajnandgaon : रांजणगाव एमआयडीसी गोडाऊन चोरीचा गुन्हा 72 तासांत उघड; 68 लाखांचा मुद्देमाल जप्त

रांजणगाव एमआयडीसी परिसरातील चमाडीया गोडाऊनमध्ये आयटीसी कंपनीच्या सिगारेट, बिस्किटे, साबण आदी वस्तूंची चोरी झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा उलगडा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केवळ ७२ तासांत केला आहे. या कारवाईत तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Jalna Live : मनरेगा कामांच्या मस्टरवरून भोकरदन तहसीलदार कार्यालयात डफडं वाजवत अनोखे आंदोलन

जालन्यातील मनरेगा कामांच्या मस्टर नोंदी न काढल्याच्या निषेधार्थ भोकरदन तहसील कार्यालयात आज अनोखे आंदोलन पाहायला मिळाले.
मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी गायगोठे, वृक्षलागवड आणि सिंचन विहिरींचा लाभ घेतला असून कामे सुरू असतानाही पंचायत समिती प्रशासन मस्टर काढण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या मागणीसाठी नारायण लोखंडे आणि विकास जाधव या दोन तरुण शेतकऱ्यांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याने आज मंगेश साबळे यांनी थेट तहसीलदारांच्या दालनात जाऊन डफडं वाजवत आंदोलन करत लक्ष वेधले.

Live: नवी मुंबईत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवणार

नवी मुंबई शहरामध्ये शिवसेना-भाजप आम्हाला विचारात नसल्यामुळे आम्ही शरद पवार गटावर सोबत जाण्याचा निर्णय घेत आहोत त्यामुळे पुणे पाठोपाठ आता नवी मुंबई शहरात अजित पवार गटाने शरद पवार गटाकडे पंधरा जागेचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्यामुळे नवी मुंबई शहरांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार आहे

Live: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

 २ जानेवारी २०२६ पर्यंत VIP दर्शन व्यवस्था असणार बंद

- नाताळ आणि वर्षअखेर निमित्ताने लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी

- एका भाविकाला दर्शनासाठी लागतोय 3 ते 4 तासाचा वेळ

- सामान्य भाविकांना VIP दर्शनामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी देवस्थानकडून व्हीआयपी दर्शन सेवा बंद करण्याचा निर्णय

- त्र्यंबकेश्वरसह नाशिकमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी

- दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी मंदिर प्रशासनाकडून मोफत पाणी बॉटल आणि फळांची व्यवस्था

Live: संभाजीनगरच्या भाजप कार्यालयात मराठवाड्याच्या पाचही महानगरपालिकेची चर्चा

मराठवाड्यातील पाचही महानगरपालिकेमध्ये युती संदर्भात ते प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत, आज मराठवाड्यातील पाचही महानगरपालिके संदर्भात चर्चा करून तिढा सोडवण्याचा बावनकुळे प्रयत्न करणार आहे. प्रत्येक महानगरपालिके संदर्भात स्वतंत्र चर्चा करणार आहेत. संभाजीनगर सह मराठवाड्यातील पाचही महानगरपालिका संदर्भात अजून पर्यंत युती संदर्भात दोन्ही पक्षांकडून ताठर भूमिका पहायला मिळत आहे त्याच संदर्भात बावनकुळे आज प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून युतीचा तिढा सोडवतील का याकडे लक्ष असेल

Live: नाशिकमध्ये मागील ३ दिवसांपासून भाजपकडून युतीची चर्चा नाही

- आम्ही भाजपच्या निरोपाची वाट पाहत आहोत, शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांची माहिती

- आणखी किती दिवस वाट पाहणार? शिंदेंच्या शिवसेनेकडून डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात

- भाजपसोबत युतीची वाट न पाहता शिंदेंच्या शिवसेनेकडून १२२ वॉर्डात शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात

- भाजपकडून फक्त चर्चेचं गुऱ्हाळ, आम्हाला सन्मानपूर्वक ४५ जागा हव्यात

- मोठ्या भावाने आमच्या ताटातलं हिसकावून घेऊ नये, अन्यथा स्वबळाची आमची तयारी

- शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांचा भाजपला इशारा

Uttarakhand Live : उत्तराखंडमध्ये काश्मिरी शाल विक्रेत्यावर हल्ला करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एफआयआर दाखल

काश्मिरी शाल विक्रेत्यावर हल्ला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआरनंतर, पोलिसांनी एका माहिती देणाऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे बजरंग दलाचे नेते अंकुर सिंग आणि इतर कार्यकर्त्यांना अटक केली.

Thane Live : ठाण्यात पोखरण रोड परिसरात दोन बिबटे नागरिकांना आढळले

ठाण्यातील पोखरण रोड परिसरात दोन बिबट्यांनी नागरिकांना दर्शन दिले आहे. हे बिबटे कालपासून परिसरात फिरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Latur liveupdate : निवडणूक आयोगाचा आगळावेगळा नियम; उमेदवारांची घेणार लेखी चाचणी

लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना निबंध लिहावा लागणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले असून, अनेक राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी विविध पद्धतीने प्रयत्न करत आहेत. उमेदवारीसाठी लागणारी धावपळही सुरू आहे. यावेळी निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे. उमेदवारांना केवळ प्रतिज्ञापत्र देऊन चालणार नाही, तर प्रत्येक उमेदवाराला शहराचा विकास कसा करणार आणि निवडून आल्यानंतर विकासासाठी कोणत्या उपाययोजना आखणार, यासाठी 100 ते 500 शब्दांमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात निबंध लिहावा लागणार आहे. नामनिर्देशन पत्राच्या शेवटच्या पानावर यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

Liveupdate: आर पी आय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली अजित पवारांची भेट

आर पी आय खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी अजित पवारांची भेट घेतली. सचिन खरात यांनी अजित पवारांना पत्र दिले आणि सांगितले की, आम्ही समविचारी पक्ष म्हणून अजित पवारांसोबत जाण्यास तयार आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सचिन खरात यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. सन्मानपूर्वक जागा दिल्यास आम्ही अजित पवारांसोबत निवडणूक लढू, असे सचिन खरात यांनी अजित पवारांना पत्रात म्हटले आहे.

Pune: भाजपाचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे जेलमध्ये असताना सकाळी निधन

Pune: भाजपाचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे जेलमध्ये असताना सकाळी निधन

भाजपाचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे जेल मध्ये असताना सकाळी निधन

सकाळी त्रास झाल्याने त्यांना येरवडा प्रशासनाने ससून येथे दाखल केले होते त्यावेळी त्यांचे निधन झाले

जमिनासाठी चा अर्ज होता प्रलंबित आजच होती सुनावणी

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची युती

Kolhapur: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची युती

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकी साठी आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची युती

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वच 81 जागांवर निवडणूक लढवण्याची आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची तयारी

महाविकास आघाडीमध्ये सन्मानार्थ जागा न मिळाल्याने आम आदमी पार्टीची भूमिका

आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत होणार घोषणा

Pune: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांना सोडून महाविकास आघाडीत आले तर त्यांनाही घेणार

काल काँग्रेस आणि उद्धव ठाकरे ची शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाची बोलणी झाल्याची माहिती

महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि उद्योग ठाकरेचे शिवसेना एकत्र राष्ट्रवादी अजित पवारांना सोडून आली तर त्यांना घेऊन लढणार

मनसे बाबत अजून तरी काही विचार नाही

Nashik Live : सोलर प्लांट केबल चोरी करणारी चार जणांची टोळी अटकेत

नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मालेगाव, वडनेर-खाकुर्डी आणि देवळा येथील सोलर प्लांटवर लक्ष केंद्रीत करून केबल चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पकडण्यात यश मिळाले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही टोळी अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून चोरीच्या ३९५ किलो तांब्याच्या तारांचा जप्त केला, ज्याची किंमत सुमारे चार लाख रुपये आहे. तसेच, या गुन्ह्यात वापरलेली मारुती कार आणि एक मोटरसायकल यांचा सुमारे साडेसात लाख रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Nashik Live : नाशिकमध्ये मनसे-महाविकास आघाडीचा नवा जागावाटप फॉर्म्युला

नाशिकमध्ये जागावाटपावरून होणारे संभाव्य वाद टाळण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीने महापालिका निवडणुकीसाठी नवा पॅटर्न ठरवला आहे. या पॅटर्ननुसार प्रत्येक प्रभागात ज्या पक्षाकडे मजबूत उमेदवार असेल, ती जागा त्या पक्षाला सोडली जाणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीने एकत्र महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Shivsena bjp live: संभाजीनगरात शिवसेना-भाजपची निर्णायक बैठक; जागावाटपावर आज होणार अंतिम चर्चा?

संभाजीनगरात आज शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपावर सहावी बैठक पार पडत असून, दोन्ही पक्ष अधिकाधिक जागांसाठी ठाम भूमिका घेत असल्याने चर्चेला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील बैठकींमध्ये मतभेद कायम राहिल्याने आजच्या चर्चेत तोडगा निघणार का, याकडे राजकीय वर्तुळासह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक युतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

New Delhi : आपचे नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह तीन नेत्यांविरोधात धार्मिक भावना दुखावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

नवी दिल्ली : प्रदूषणामुळे सांता क्लॉज बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडला असल्याचे दर्शविणाऱ्या कृत्यात सहभागी होणारे आम आदमी पक्षाचे (आप) नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह तीन नेत्यांविरोधात धार्मिक भावना दुखावण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ॲड. खुशबू जॉर्ज यांनी याबाबत तक्रार दिली होती.

Gujarat Earthquake : पहाटे ४.३० वाजता गुजरातच्या कच्छमध्ये ४.४ तीव्रतेचा भूकंप

आज भारतीय प्रमाणवेळेनुसार, पहाटे ४.३० वाजता गुजरातच्या कच्छमध्ये ४.४ तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहित राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे.

Ajit Pawar : पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा आज पुण्यात

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार आज पुन्हा एकदा भेटीगाठी घेणार आहेत.

Bangladesh News : बांगलादेशात हल्ले सुरूच, आणखी एका हिंदू नागरिकाची हत्या

ढाका : बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले सुरूच असून दिपूचंद्र दास या हिंदू नागरिकाच्या खुनाची घटना उघड झाल्यानंतर राजबरीच्या पांगशा उपजिल्ह्यामध्ये अमृत मोंडल ऊर्फ सम्राट या हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. बांगलादेशातील ‘डेली स्टार’ या नियतकालिकामध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मागील वर्षी हिंसक आंदोलनानंतर अमृत मोंडल याने पलायन केले होते पण परिस्थिती निवळल्यानंतर तो होसेदांगा येथे परतला होता.

Kolhapur Municipal Corporation Elections : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या ३० उमदेवारांची यादी काँग्रेसकडून आज प्रसिद्ध होण्याची शक्यता

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेने (ठाकरे गट) मध्ये एकमत झाले आहे. मात्र, राष्ट्रवादीशी (शरद पवार गट) अद्यापही सूत जुळलेले नाही. दरम्यान, शिवसेनेने मागितलेल्या जागा वगळून काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील ३० उमेदवारांची यादी आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.

Belgaum News : सौंदत्तीत सराफी दुकानात १२ लाखांचा दरोडा, शटर उचकटून दागिने लुटले

बेळगाव : सराफी दुकान फोडून दरोडेखोरांनी १२ लाखांचे दागिने पळविल्याची घटना सौंदत्ती शहरात उशिरा उघडकीस आली. दरोडेखोरांनी दुकानाचे शटर उचकटून दागिने पळवल्याचे व्हिडिओत दिसत आहे. एकूण ६ ते ७ जण दरोडेखोरांच्या टोळीने दुकानात हा दरोडा घातल्याचे आढळून आले आहे.

Municipal Corporation Election : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग

Latest Marathi Live Updates 26 December 2025 : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. राजधानी मुंबईमध्ये सर्वपक्षीयांच्या जोर बैठका आणि खलबते पाहायला मिळत आहेत. तसेच स्पर्धा परीक्षांमधील चुका, गोंधळ आणि वाद टाळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रेहमान हे तब्बल सतरा वर्षांचा राजकीय विजनवास संपवून मायदेशी परतलेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.