टीम इंडियाने ओपनर आणि लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर सलग तिसरा टी 20I सामना जिंकत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. भारताने श्रीलंकेवर तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये तिसर्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. श्रीलंकेने भारतासमोर 113 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान शफालीच्या खेळीच्या मदतीने सहज पूर्ण केलं. भारताने 13.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 115 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 5 सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली. भारताने या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडी मिळवली आहे.