Ohh Shit: रोहित शर्मा मॅच खेळत होता अन् 'तो' अचानक कोसळला; तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पळापळ झाली अन् सर्वच घाबरले
esakal December 27, 2025 06:45 AM

Mumbai player stretchered off vs Uttarakhand: रोहित शर्माचा ( Rohit Sharma) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील खेळ पाहण्यासाठी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज पुन्हा एकदा प्रचंड गर्दी जमली. पण, सकाळी स्टेडियम खचाखच प्रेक्षकांनी पूर्ण भरेपर्यंत रोहित गोल्डन डकवर बाद झाला होता. तरीही रोहितला क्षेत्ररक्षण करताना पाहण्यासाठी थांबलेल्या प्रेक्षकांना सायंकाळी अनपेक्षित घटना पाहावी लागली. मुंबईचा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना मैदानावर कोसळला आणि काहीवेळ तो तसाच पडून राहिला. वैद्यकीय टीम धावली आणि तातडीने स्ट्रेचर मागवला गेला. खेळाडूला त्यावर उचलून ठेवले गेले आणि नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

Virat Kohli's World Record: कोहलीचा 'विराट' पराक्रम, नावावर केला विश्वविक्रम; क्रिकेट विश्वातील दिग्गजाला मागे सोडले

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३३१ धावा केल्या. रोहित पहिल्याच षटकात भोपळ्यावर बाद झाला. अंगकृश रघुवंशीही ११ धावांवर माघारी परतला. पण, मुशीर व सर्फराज या खान बंधूंनी प्रत्येकी ५५ धावा करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर हार्दिक तामोरेने ८२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ९३ धावांची नाबाद खेळी केली. त्याला सिद्धेश लाड ( २१) व कर्णधार शार्दूल ठाकूर ( २९) यांच्यासह शाम्स मुलानीची ( ४८) साथ मिळाली.

रोहितला फलंदाजीत अपयश आले असले तरी त्याने क्षेत्ररक्षणात एक सुरेख झेल टिपला. शार्दूलच्या गोलंदाजीवर उत्तराखंडचा सलामीवीर कमाल ( १) स्लीपमध्ये रोहितकरवी झेलबाद झाला. युवराज चौधरी व कुणाल चंडेला (३२) यांच्या ५१ व युवराज व अंजानेया सूर्यवंशी (२०) यांच्या ६१ धावांच्या भागीदारीने उत्तराखंडला विजयाच्या आशा दाखवल्या. पण, ओंकार तरमाळे व शाम्स यांनी दोघांना बाद केले.

Angkrish Raghuvanshi injured Vijay Hazare Trophy match

युवराज मैदानावर उभा राहिला, परंतु त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. त्याने ९६ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावा केल्या. शार्दूलने ही विकेट घेतली. उत्तराखंडच्या ४२ षटकांत ७ बाद २२९ धावा झाल्याने मुंबईचा विजय पक्काच होता. पण, एक अनपेक्षित प्रसंग घडला. मुंबईचा खेळाडू रघुवंशी अशक्य झेल घेण्याच्या प्रयत्नात मैदानावर पडला. यात त्याच्या खांद्याला व डोक्याला जबर मार बसला. त्यामुळे तो बराच वेळ मैदानावर पडून होता.

Angkrish Raghuvanshi injured Vijay Hazare Trophy match

वैद्यकिय टीमने मैदानावर धाव घेत परिस्थिती पाहिली आणि तातडीने स्ट्रेचर मागवले. यावेळी सर्वच घाबरले होते. रघुवंशीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी नेण्यात आले आहे. अद्याप त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट्स समोर आलेले नाहीत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.