Gen Z : 'जेन झी अन् जेन अल्फा' विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करतील! PM मोदींचं मोठं विधान; म्हणाले, पूर्वी स्वप्न पाहाणं...
Sarkarnama December 27, 2025 07:45 AM

नवी दिल्ली शिखांचे गुरु श्री गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादे जोरावरसिंग आणि फतेहसिंग यांच्या अतुलनीय साहस आणि बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ २६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. यानिमित्त आज लहान मुलांना वीरता पुरस्कारांचं पंतप्रधानांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी जेन झी आणि जेन अल्फाबाबत महत्वाचं विधान केलं. विकसित भारताच्या व्हिजनमध्ये त्यांची भूमिका विशद केली.

Sambhaji Nagar News: महायुतीचा 'रात्रीस खेळ चाले'! भाजप अध्यक्षांच्या घरी रात्री उशीरापर्यंत बैठक, पण... विकसित भारताचं लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जेन झी' आणि 'जेन अल्फा'ला संबोधित करताना म्हटलं की, "तुमची पिढीच भारताला विकसित भारताच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवेल. मी जेन झीची योग्यता, आत्मविश्वास पाहतोय, समजून घेतोय आणि त्यामुळंच तुमच्यावर विश्वासही ठेवतोय. यापूर्वी तरुण मंडळी स्वप्न पाहायला देखील घाबरायचे कारण जुन्या व्यवस्थेत असं वातावरणच तयार करुन ठेवलं होतं की काही चांगलं होऊच शकत नाही. चारही दिशांना निराशेचं वातावरण होतं, पण आज देश तरुणांमधील प्रतिभा ओळखतोय आणि त्यांना व्यासपीठही उपलब्ध करुन देतोय.

Sambhaji Nagar News: महायुतीचा 'रात्रीस खेळ चाले'! भाजप अध्यक्षांच्या घरी रात्री उशीरापर्यंत बैठक, पण... इंटरनेटची ताकद

डिजिटल इंडियाच्या यशस्वीतेमुळं तुमच्याजवळ इंटरनेटची ताकद आहे. तुमच्याजवळ शिकण्याचा स्त्रोत आहे, हा स्त्रोत आता विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्समध्ये देखील पुढे जायला हवा. त्यासाठी त्यांच्याजवळ स्टार्टअप इंडिया मिशन आहे. अशी अनेक व्यासपीठं तुम्हाला पुढे नेणार आहेत. तुम्हाला केवळ लक्ष्य केंद्रित करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला शॉर्ट टर्म पॉप्युलॅरिटीच्या चकमकीत फसायचं नाही. तुम्हाला तुमच्या यशस्वीतेला केवळ तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवायचं नाही. तुमचं लक्ष्य असायला हवंय की तुमची यशस्वीताच देशाची यशस्वीता असायला हवी.

Mumbai BMC elections: मुंबईत मनसेचे 'इंजिन' सुसाट! उमेदवार ठरले; उद्या मिळणार अधिकृत 'एबी' फॉर्म!

दरम्यान, देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या २० विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या अतुलनीय शौर्यासाठी प्रदान करण्यात आल्या. हा सन्मान केवळ तुमचाच सन्मान नसूर तुमच्या माता-पिता आणि शिक्षक आणि शौर्याच्या प्रराक्रमाचं कौतुकही केलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.