शिरूरमध्ये नाताळनिमित्त कपडे वाटप
esakal December 27, 2025 08:45 PM

शिरूर, ता. २६ : शहरातील पुरातन चर्चमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माचा सोहळा विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी फादर नीलेश विभूते यांच्या हस्ते वीटभट्टीवरील कामगार, गोरगरिबांना कपडे व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, बुधवारी (ता. २४) रात्री ख्रिस्त बांधवांनी शहरातून दिंडी काढून ठिकठिकाणी येशूंची गुणगान करणारी गीते सादर केली. गुरुवारी (ता. २५) लाटे आळीतील चर्चमध्ये झालेल्या सोहळ्यात ख्रिस्ती बांधवांसह सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. मराठी मिशनच्या येथील रेव्हरंड ओझरो मेमोरीयल सेवाचर्चमध्ये झालेल्या सोहळ्यासाठी रोषणाई केली होती. त्यानंतर येशूंच्या जन्मानिमित्त नगरसेविका डॉ. सुनीता पोटे, नगरसेविका ॲड. आयेशा सय्यद, जय भवानी नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष अविनाश घोगरे, मुस्लिम जमातचे कलिम सय्यद, महिला दक्षता समितीच्या कल्पना पुंडे आदींच्या हस्ते केक कापण्यात आला. लहान मुलांना केक, चॉकलेट तसेच पेढ्यांचे वाटप करण्यात आले. ॲड. तेजस विभूते यांनी स्वागत, तर निशिकांत पिल्ले, प्रतिभा अमळनेरी, ग्रेस शेलार, सविता सूर्यवंशी, जय गायकवाड, संजय अमळनेरी यांनी या सोहळ्याचे संयोजन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.