नव्या वर्षाचे स्वागत करताना प्रत्येकालाच काहीतरी खास आणि विस्मरणीय हवे असते. सहसा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोकांची पहिली पसंती गोवा किंवा मनाली यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांना असते, पण तिथे होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि तासनतास चालणारी वाहतूक कोंडी उत्साहावर विरजण घालू शकते. अशा वेळी गर्दीचा आवाज टाळून निसर्गाच्या कुशीत किंवा ऐतिहासिक वातावरणात २०२५ चे स्वागत करणे जास्त बेस्ट ठरते.
Tirthan valley, himachal pradesh
तीर्थन व्हॅली (हिमाचल प्रदेश)जर तुम्हाला डोंगरांच्या अगदी जवळ आणि नदीच्या खळाळत्या आवाजात नवीन वर्ष साजरे करायचे असेल, तर हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅली हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. मनालीच्या गजबजाटापासून दूर असलेल्या या व्हॅलीमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने निसर्गाशी संवाद साधता येतो. इथल्या लाकडी होमस्टेमध्ये राहून स्थानिक जेवणाचा आस्वाद घेणे आणि थंडीच्या रात्री शेकोटीभोवती गप्पा मारणे, हा एक कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा अनुभव असतो. तीर्थन नदीच्या काठावर बसून नवीन वर्षाचे संकल्प करणे मनाला उभारी देते. (Tirthan valley, himachal pradesh)
Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल
Landour, uttarakhand
लँडोर (उत्तराखंड)दुसरीकडे उत्तराखंडमधील लँडोर हे अशाच शांतताप्रिय पर्यकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. मसुरीच्या अगदी जवळ असूनही, या लहानशा कॅन्टोन्मेंट टाऊनने आपले जुन्या जगाचे आकर्षण अजूनही टिकवून ठेवले आहे. इथल्या पाईन आणि देवदारच्या झाडांमधून चालताना मिळणारा अनुभव शब्दांत सांगण्यापलीकडचा असतो. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला इथल्या 'चार दुकान' परिसरात बसून गरम कॉफी आणि पॅनकेक्सचा आनंद घेत हिमालयाच्या रांगांकडे पाहणे, हे कोणत्याही मोठ्या पार्टीपेक्षा अधिक आनंददायी वाटते. इथली शांतता आणि धुक्यात हरवलेली सकाळ तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात प्रसन्न करते. (Landour uttarakhand)
Viral Memes : कोल्ड प्ले किस, महाकुंभ मोनालीसा ते इंडियन बजेटपर्यंत...2025 वर्षांत व्हायरल झाले टॉप 10 मिम्स, हसून हसून पोट दुखेल
Gokarna, karnataka
गोकर्ण (कर्नाटक)समुद्रकिनारा हवा असेल पण गोव्याची गर्दी नको असेल, तर कर्नाटकातील गोकर्ण हे ठिकाण २०२५ च्या सुरुवातीसाठी अगदी योग्य आहे. गोकर्ण हे केवळ धार्मिक स्थळ नसून इथले 'ओम बीच' आणि 'हाफ मून बीच' तरुण पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. इथल्या किनाऱ्यावर संध्याकाळी होणारी सूर्यास्ताची दृश्ये आणि रात्रीच्या वेळी समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत नवीन वर्षाचे स्वागत करणे ही एक आगळीवेगळी मेजवानीच असते. इथल्या कॅफे संस्कृतीमध्ये तुम्हाला शांतता आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टींचे योग्य मिश्रण पाहायला मिळते. (Gokarna, karnataka)
19 Minute 34 Second Viral Video पासून ते हसण्या-रडण्यापर्यंत..2025 वर्षांत व्हायरल झालेत हे टॉप 10 व्हिडिओ
Orchha, madhya pradesh
ओरछा (मध्य प्रदेश)इतिहास आणि वास्तुकलेची आवड असणाऱ्यांसाठी मध्य प्रदेशातील ओरछा हे एक लपलेले रत्न आहे. बेतवा नदीच्या काठी वसलेले हे शहर आपल्या भव्य छत्री आणि किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने ओरछाला भेट देणे म्हणजे काळाच्या मागे जाण्यासारखे आहे. येथील राम राजा मंदिरातील भजन आणि बेतवा नदीच्या घाटावरील संध्याकाळची आरती मनात साठवून ठेवण्यासारखी असते. इतिहासाच्या साक्षीने नवीन वर्षात पदार्पण करणे हा एक समृद्ध अनुभव ठरतो. (Orchha, madhya pradesh)
Leopard Video : भर लग्नात घुसला बिबट्या! लोकांच्या अंगावर गेला धावून; जेवणाची केली नासधूस, धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल
Ziro Valley, arunachal pradesh
झिरो व्हॅली (अरुणाचल प्रदेश)शेवटी जर तुम्हाला भारतातील एका अगदी अनोख्या आणि दुर्गम भागात नवीन वर्षाचे स्वागत करायचे असेल तर अरुणाचल प्रदेशातील झिरो व्हॅली पेक्षा चांगले ठिकाण नाही. ईशान्य भारताचे सौंदर्य आणि तिथली अपातानी जमातीची संस्कृती तुम्हाला थक्क करून सोडते. चहूबाजूंनी डोंगररांगा आणि मधोमध असलेल्या भातशेतीमुळे या व्हॅलीला एक वेगळाच लूक येतो. झिरोमधील थंडी आणि तिथल्या लोकांचे आदरातिथ्य तुमचे नवीन वर्ष खास बनवेल. या पाचही ठिकाणांपैकी कोणतेही ठिकाण निवडले तरी तुमची २०२५ ची सुरुवात ही गर्दीपासून दूर, निसर्गाच्या आणि स्वतःच्या जास्त जवळ जाणारी असेल. (Ziro Valley, arunachal pradesh)