swt2425.jpg
13222
बांदा ः येथील नाबर प्रशालेत आयोजित कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मंगेश कामत. सोबत इतर मान्यवर.
नाबर इंग्लिश मिडीयमचे
स्नेहसंमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ः श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. यावेळी मुलांनी विविध सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.
कर्यक्रमाची सुरुवात प्रो. फिरोज सय्यद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डिंगणे गावचे माजी सरपंच नितीन सावंत, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य नारायण पित्रे, संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, राजेश गोवेकर, भिकाजी धुरी, सुरेश गावडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर, पर्यवेक्षक रसिका वाटवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतीक्षा शिरोडकर, शाळेचा हेड बॉय सुयश गावकर, हेड गर्ल वेदा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. सय्यद म्हणाले, ‘‘कामत ट्रस्ट चालवत असलेली नाबर शाळा ही अद्ययावत प्रशाला आहे व सतत १८ वर्षे दहावीचा १०० टक्के गुणवत्ता पूर्ण निकाल देणारी शाळा आहे आणि अशी शाळा बांद्यासारख्या छोट्या शहरात असण हे बांद्यासाठी भूषणावह आहे.’’
विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमाने यावेळी रंगत आणली. यातील भारतातील विविध संस्कृती, देशभक्ती, मातृ-पितृ भक्ती, स्वच्छता या कार्यक्रमांद्वारे जनजागृती केली व मूल्यांची शिकवण दिली पैकी छावा, महाभारत या कार्यक्रमांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. प्रास्ताविक मनाली देसाई यांनी केले. पाहुण्यांची ओळख रसिका वाटवे यांनी केली. सूत्रसंचालन शिल्पा कोरगावकर, स्नेहा नाईक, दीक्षा नाईक, कल्पना परब यांनी केले. आभार प्रतिक्षा शिरोडकर यांनी मानले.