रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांकडून प्रयत्न केली जात आहेत. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच हे युद्ध थांबवण्याकरिता शांतता प्रस्ताव तयार केला मात्र, त्याला युक्रेनकडून विरोध करण्यात आला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शनिवारी कॅनडामध्ये दाखल झाले. कॅनडानंतर ते अमेरिकेत दाखल होऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की सातत्याने अमेरिकेच्या दाैऱ्यावर जाताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात मीडियासमोर चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा इतकी जास्त फिस्कटली की, झेलेन्स्की थेट भर चर्चेतून उठून जाताना दिसले. झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चा वादग्रस्त ठरली आणि भर पत्रकार परिषद रागात सोडून जाताना झेलेन्स्की दिसले. यावेळी लोकांनी त्यांच्या कपड्यांवरून अनेक गोष्टी बोलल्या. त्यानंतर आता पुन्हा झेलेन्स्की हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला जात आहेत.
अमेरिकेने दिलेला पहिला प्रस्ताव झेलेन्स्की यांनी नाकारल्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावात होते. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना टार्गेट करत थेट म्हटले होते की, आतापर्यंत केलेल्या सर्व मदत विसरून आता हे आमच्याबद्दल बोलत आहेत. रशियासोबतच्या युद्धादरम्यान इतकी जास्त मदत करूनही कधी धन्यवादही अमेरिकेचे बोलले गेले नाही. यानंतर झेलेन्स्की यांनी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
अमेरिकेसोबत असलेल्या तणावाच्या स्थितीमध्ये झेलेन्स्की अमेरिकेत पोहोचले आहेत. यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. रशिया युक्रेन युद्ध खरोखरच थांबेल का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. युक्रेन काही गोष्टींवर तटस्थ भूमिका घेत असल्याने अमेरिका संताप व्यक्त करत आहे. हेच नाही तर त्यांनी थेट झेलेन्स्की यांना जेलमध्ये टाकण्याबद्दलही मोठे भाष्य केले.
झेलेन्स्की डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी निघाले असतानाच अवघ्या काही तासांपूर्वी रशियाने राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी पुन्हा एकदा हल्ले केले. रशियाने आघाडीच्या रेषेवरील वेगवेगळ्या ठिकाणी दोन शहरे ताब्यात घेऊन नवीन भूभाग मिळवल्याचा दावाही केला आहे. रशिया कोणत्याही परिस्थितीमध्ये या युद्धात झुकत नाही. नाटो देश युक्रेनला मदत करत असल्याचे जग जाहीर आहे.