Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने विधिवत प्रारंभ
esakal December 28, 2025 09:45 PM
Live : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने विधिवत प्रारंभ

तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने विधिवत प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची शाकंभरी नवरात्र महोत्सवपूर्वीची मंचकी निद्रा संपल्यानंतर देवी आज पहाटे सिंहासनावर विराजमान झाली. दुपारी महोत्सवाचे यजमान उल्हास कागदे यांनी गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना केली.

पुढील सात दिवस मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, देवीची अलंकार महापूजा तसेच दररोज छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. ३ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला पूर्णाहुतीनंतर घटोत्थापनाने या नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.

Kolhapur Live : पक्षाचा आदेश शिरसावंद्य! कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवणार नाही – कृष्णराज महाडिक

मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून पक्षपातळीवर घेतलेल्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना असून, पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून कार्यकर्ते काम करत असतात, असेही त्यांनी नमूद केले.

महापालिकेची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवत असल्याने इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने आपण निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी जाहीर केली होती, मात्र पक्षीय पातळीवर झालेल्या अंतिम निर्णयानुसार आता निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, या निवडणुकीसाठी पक्षात आपल्या नावाचा विचार झाला, ही बाब आपल्यासाठी समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही समाजकारणात सक्रिय राहणार असून, आपल्यावर प्रेम व पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि कुटुंबीयांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

KDMC Election : कल्याण पूर्व-पश्चिमेत भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश; महायुतीतील जागावाटपावर तीव्र नाराजी

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत झालेल्या जागावाटपामुळे भाजपमध्ये असंतोष उफाळून आला आहे. कल्याण पूर्वेत भाजपला केवळ ७ जागा मिळाल्याच्या निषेधार्थ काल रात्री भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले होते.

या घटनेनंतर आता कल्याण पश्चिमेतही भाजपला ९ जागा देण्यात आल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रस्त्यावर उतरले असून, ‘युती नको’ अशा जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर अन्याय झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असा ठाम इशाराही आंदोलनादरम्यान देण्यात आला आहे.

Live Update: वंचित आणि काँग्रेसचे नातं चांगल- सपकाळ

वंचित आणि काँग्रेसचे नातं चांगल सपकाळ म्हणाले. हे मित्र पक्ष आहेत असे म्हणाले.

Nashik Live update: त्र्यंबकेश्वर मंदिरात ५ जानेवारीपर्यंत VIP दर्शन बंदी, जिल्हा प्रशासनाचे आदेश

त्र्यंबकेश्वर येथे ५ जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शनावर बंदी घालण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

Maharashtra Live News Update: कृष्णराज महाडिक कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार

महापालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी खासगी चर्चेत सांगितले की प्रभाग क्रमांक तीनमधून कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

PM Modi Live : या वर्षी भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा आणि विज्ञानापासून सर्वत्र एक मजबूत ठसा उमटवला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या वर्षी भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा आणि विज्ञानापासून ते जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठापर्यंत सर्वत्र एक मजबूत ठसा उमटवला आहे. ऑल इंडिया रेडिओवरील त्यांच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की, २०२५ मध्ये प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणारे अनेक क्षण आले. ते म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर' या वर्षी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक बनले. ते म्हणाले की, जगाने स्पष्टपणे पाहिले की आजचा भारत आपल्या सुरक्षेशी तडजोड करत नाही.

Badalapur Live : बसचालकावर कारचालकाचा जीवघेणा हल्ला

बदलापूरमध्ये एका कारचालकाने एसटी बसचालकावर जीवघेणा हल्ला केला आहे. नेमका हा वाद कशामुळे पेटला हे समोर आले नाही.

Mallikarjun Kharge Live : संविधान आणि लोकशाही धोक्यात- मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस स्थापना दिनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, आज संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. मोदी सरकार संवैधानिक संस्था आणि लोकांचे हक्क कमकुवत करत आहे. सरकार मनरेगा नष्ट करत आहे आणि भांडवलदारांसाठी कायदे करत आहे असा आरोप करत खरगे यांनी भाजपचे धोरण राष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचे म्हटले.

Sanjay Raut Live : जागावाटपात ठाकरे बंधूमध्ये कोणताही तिढा नाही- संजय राऊत

मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागा वाटपात कोणताही तिढा नाही तसेच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही असे संजय राऊत यांनी सांगितले.

Mumbai News: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील पहाटेची दृश्ये PMC Election News: पुण्यात शिंदे-पवार एकत्र लढणार?

शिवसेनेला भाजपकडून सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याचं समोर आले होते. आता यातच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना युतीची चाचपणी होत आहे. शनिवारी रात्री उशिरा अजित पवार यांच्याकडून शिवसेनेच्या एका नेत्याला फोन केल्याचे समोर आले.

Pune Politics: धंगेकरांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढवणार

रविंद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कर्नाटकातील कारवार बंदरातून सागरी प्रवासाला निघणार

राष्ट्रपती कार्यालयाने सांगितले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रविवारी कर्नाटकातील कारवार बंदरातून पाणबुडी प्रवासाला निघतील. मुर्मू (६७) हे पाणबुडीतून प्रवास करणारे दुसरे राष्ट्रप्रमुख असतील.

Aravalli Range News: सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगेच्या व्याख्येशी संबंधित प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली

सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगेच्या व्याख्येशी संबंधित प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांचे सुट्टीकालीन खंडपीठ २९ डिसेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी करणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.