Marathi Actress Arrested: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची सून आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमलता आदित्य पाटकर यांच्यासह एका महिलेला खंडणी घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सुरु झालेल्या या प्रकरणात, दोन्ही आरोपी लोकांकडून सुमारे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने दिली आहे.
या प्रकरणात आरोपी हेमलता पाटकर (39) आणि तिची सहधारक अमरिना इक्बाल झवेरी (33) यांना अटक करण्यात आली. दोघींना पोलिसांनी पोलीस कोठडी सुनावली असून, न्यायालयाने त्यांची कोठडी सोमवार पर्यंत वाढवली आहे.
Sunidhi Chauhan: हे काय होतं..? लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानच्या डान्स मूव्ह्स बघून नेटकरी थक्क, म्हणाले...पोलिस तपासानुसार, तक्रारदार अरविंद गोयल (52) या गोरेगाव पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या प्रकरणात एका गुन्ह्याला मिटवण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला 10 कोटी रुपये खंडणी म्हणून मागितली होती. आरोपी महिलांनी नंतर त्यांच्या मागणीची रक्कम दीड कोटी रुपयांपर्यंत कमी केली असल्याचे गुन्हे शाखेकडे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
Actor Apologised: महिला आयोगासमोर प्रसिद्ध अभिनेत्याने मागितली माफी; महिलांच्या कपड्यांवर केली होती 'ही' अश्लील कमेंटपोलिसांनी न्यायालयात सांगितले की, हेमलता पाटकर यांच्या नावावर मेघवाडी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 323 आणि 504 अंतर्गत एक फौजदारी गुन्हाही आधीच नोंदवला आहे. तसेच, तपासादरम्यान आरोपींनी तपासात पुरेसे सहकार्य न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपींच्या विरोधात अधिक तपास सुरू असून, पोलीस हेमलता पाटकरचे हस्ताक्षराचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, अमरिना झवेरी यांचे आवाजाचे नमुनेही तपासात घेतले जाणार आहेत. पोलिसांना संशय आहे की, आरोपी महिला सह अन्य फरार आरोपींसोबत मिळून इतरही व्यक्तींकडून खंडणी मागितली असावी.
या प्रकरणामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रातच नाही तर सामान्य जनमानसातही खंडणी आणि फसवणुकींसारख्या गुन्ह्यांविरुद्ध जागरुकता वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, कोणालाही फसवणुकीच्या तक्रारींवर त्वरित पोलिसांकडे जाणे आवश्यक आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करता येईल आणि दोषींविरोधात कारवाई करण्यात यावे.