Seema Haider : तो 6 लेकरांचा बाप तरीही…सीमा हैदर सचिनवर भडकली; तक्रारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!
Tv9 Marathi December 29, 2025 12:45 AM

Seema Haider Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियाच्या जोरावर आजघडील शेकडो लोक लक्षाधीश झाले आहेत. काही लोकांना तर मोठी प्रसिद्धीही मिळालेली आहे. आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचेही नशीब सोशल मीडियामुळेच उजळले. तिने पाकिस्तानातून पळून येत भारतातील सचिन मीना याच्यासोबत लग्न केलेले आहे. सध्या ते दोघेही भारतातच सुखाचा संसार करतात. सध्या याच सीमा हैदरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिन मीना सहा मुलांचा बाप झालेला आहे, पण अजूनही तो लहान मुलांसारखाच वागतो, असं सीम हैदर या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे. याच व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंट्स करत असून तो व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

सीमा हैदरचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या seemasachin10__ या खात्यावर अपलोड करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे सीमा हैदर या व्हिडीओमध्ये आपल्या पतीची तक्रार करत नाहीये. सीमाने विनोदाचा भाग म्हणून हा व्हिडीओ शूट करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन मीना विटी-दांडू खेळताना दिसत आहे. त्याच्यासोबत इतरही काही मुले आहेत. विशेष म्हणजे बाहेर एवढी थंडी पडलेली असताना सचिन मीना विटी-दांडू खेळताना दिसतोय.

सीमा हैदर व्हिडीओमध्ये काय म्हणाली?

सीमा हैदर या व्हिडीओमध्ये आपला पती सचिन मीना याच्याबद्दल बोलताना दिसत आहे. अगदी मजेत ती आपल्या नवऱ्याविषयी बोलत आहे. सचिन सहा-सहा मुलांचा बाप झालेला आहे, तरीही तो लहान मुलांसारखा खेळत आहे, असं सीमा हैदर बोलताना दिसतेय. तसेच तुमच्यात कधी सुधारण होणार आहे, असेही ती सचिनला विचारताना दिसत आहे. मी नेमकं काय करू? असा सवालही ती करताना दिसत आहे. बाहेर थंडी असल्याचेही सीमा हैदर सांगताना दिसतेय.

View this post on Instagram

A post shared by Seema Sachin Meena (@seemasachin10__)

दीड लाखांपेक्षा जास्त लाईक्स

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दीड लाखांपेक्षाही जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.