Maharashtra Politics Updates : उद्योगपती गौतम अदानी बारामतीत दाखल
Sarkarnama December 29, 2025 01:45 AM
उद्योगपती गौतम अदानी बारामती विनातळावर दाखल

बारामतीतील शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी बारामती आले आहेत. ते नुकतेच बारामती विनातळावर दाखल झालेत.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पुढील पाच दिवस नाकाबंदी

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा उत्सव व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाय योजना करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या आहेत.यामध्ये दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या वाहन चालकांना अटकाव करण्यासाठी शहर पोलिसांकडून पुढील पाच दिवस शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.

महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला, भाजप ३५, शिवसेना ३२ आणि राष्ट्रवादी १४ जागांवर लढण्याची शक्यता

महायुतीत जागावाटप संदर्भात मॅरेथॉन बैठका होऊनही अद्याप घोळ मिटत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर मंत्री मुश्रीफांनी घटक पक्षाला घाम फोडत समानधारक जागा घेत तोडगा काढल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला असून भाजप ३५, शिवसेना ३२ आणि राष्ट्रवादी १४ जागा घेत असल्याची माहिती आहे.

पुण्यात वंचितची महाविकास आघाडीशी युती नाहीच

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पुणे शहरातील 41 प्रभागांमध्ये असलेल्या 41 उमेदवारांचा प्रस्ताव दिला होता. मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये 50-50-50 चा फॉर्म्युला ठरला आहे. तर जिथे भाजपविरोधात मविआला उमेदवार सापडत नाही तिथे आम्हाला स्थान दिलं जातंय, त्यांच्या या खेळीला आम्ही बळी पडणार नाही, त्यामुळे सध्या तरी आमच्यात कुठलीही युती नाही असं वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांनी सांगितलं आहे.

अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी आज बारामतीत

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आज बारामतीत येणार आहेत. त्यांच्या हस्ते बारामतीत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला जेष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार उपस्थित असणार आहेत.

अजित पवार आज बारामीत दौऱ्यावर, पहाटेपासून विकासकामांची पाहणी सुरू

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. पहाटे पाच वाजता त्यांनी बारामतीतील बस स्थानकाची पाहणी केली. यावेळी बस स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या नवीन उपाययोजना करता येतील, यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.