कातरखटाव: नवीन पुलाचे काम सुरू असताना झालेल्या सुरुंगाच्या स्फोटाने रविवारचा आठवडा बाजार व संपूर्ण कातरखटाव हादरले. या सुरुंगाने दोन व्यक्ती जखमी झाले, तर काही घरांच्या स्लॅबला व पत्र्यांना मोठी छिद्रे पडली. काही मोटारींचेही यामध्ये नुकसान झाले.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार..याबाबत माहिती अशी, की कातरखटाव येथे राष्ट्रीय महामार्ग नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत गावातील जुना पूल पाडून नवीन पुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या खांबांसाठी जमिनीमध्ये खोदकाम सुरू आहे. खोदकाम करताना पाषाणासारखा दगड लागल्याने कामगारांकडून सुरुंग स्फोटाने ते दगड फोडण्याचे काम सुरू आहे. कामगारांनी सर्व प्रकारची काळजी घेऊन आज रविवारी बाजारादिवशी हा स्फोट घडवला; परंतु दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या या स्फोटाच्या तीव्रतेने कातरखटावला हादरवून सोडले.
अचानक झालेल्या आवाजाने ग्रामस्थांची व बाजारकरूंची दैना उडाली. कातरखटावची मुख्य बाजारपेठ व घरांवर दगड पडल्याने नक्की भूकंप झाला की काय? असे लोकांमध्ये तर्कवितर्क सुरू झाले.
परंतु थोड्याच वेळात सुरुंगाची माहिती कळाल्याने ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी धाव घेतली. या घटनेत मोहन धनवडे यांच्या खांद्यावर व एका बाजारकरूंच्या पायावर दगड पडल्याने दोघे जखमी झाले. दीपक बागल यांच्या हॉटेलवर मोठा दगड पडल्याने स्लॅबला छिद्र पडून दगड खाली आला.
प्रकाश पाटोळे, मधुकर चिंचकर यांच्या पत्र्यावर दगडे पडल्याने पत्र्याला छिद्रे पडली. डांभेवाडी रोडच्या एका दुकानदाराच्या वाहनावरही दगड पडल्याने त्याचे नुकसान झाले. या घटनेनंतर सुरुंग उडविणारे मात्र पसार झाले.
Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?सुरुंगाबाबत काळजी घेताना परिसरातील लोकांना कोणतीही सूचना दिली गेली नाही. ग्रामस्थांनी ही घटना घडताच घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. ही घटना पाहून कामावर असलेल्या अभियंत्याची प्रकृती खालावली. त्याला ताबडतोब प्राथमिक रुग्णालयात हलविण्यात आले. ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, त्यांनी संबंधित कंपनीच्या धोंडेवाडी येथील कार्यालयाकडे धाव घेतली. घडलेला प्रकार कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगून नुकसान भरपाईची मागणी केली. पोलिस पाटील घनशाम पोरे यांनी परिस्थिती हाताळून वडूज पोलिसांना पाचारण केले.