Satara Crime:'शिरवळला मारहाणीतून एकाचा खून';दोघेजण पाेलिसांच्या ताब्यात, एकुलता एक मुलाबाबत घडला धक्कादायक प्रकार?
esakal December 29, 2025 03:45 PM

खंडाळा : शिरवळ (ता. खंडाळा) येथील आतिश अशोक राऊत (वय २३) याचा पळशी येथील दोन युवक व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या जबर मारहाणीनंतर उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. यावरून शिरवळ पोलिसांनी कलम १०३ अन्वये समूहाने केलेल्या खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

याप्रकरणी पळशीतील दोघांना ताब्यात घेतले आहे, तर उद्या (सोमवार) शिरवळ बंदची हाकही देण्यात आली आहे. आतिशच्या मारहाणीच्या घटनेवरून तेजस भरगुडे व दीपक भरगुडे यांना ताब्यात घेतले आहे. ही मारहाणीची घटना शनिवारी (ता. २७) घडली होती. याबाबत आतिशचे वडील अशोक राऊत यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आतिश हा शनिवारी रात्री पळशी येथे गेला असता, त्याला तेजस भरगुडे व दीपक भरगुडे व इतर साथीदारांनी जबर मारहाण केली. ही माहिती पळशी येथील पाहुणे श्री. दगडे यांनी सांगितली.

त्यानंतर आतिशला दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यावेळी आतिशला डोळ्याखाली, चेहऱ्यावर तसेच पाठीवर जखमा होत्या. यावेळी कोणी मारले असे विचारले असता तेजस भरगुडे व दीपक भरगुडेसह इतरांनी मारहाण केल्याचे समजले. आतिशला पुढे सातारा व पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेवरून शिरवळ येथील समस्त माळी समाज व शिरवळ ग्रामस्थांनी उद्या(सोमवार) ‘शिरवळ बंद’ची हाक दिली आहे. अशा अमानवी घटनेचा तत्काळ तपास करावा, अशी मागणी करत शिरवळ पोलिसांना निवेदन देण्यात आले असून, आज गावात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार.. एकुलता एक मुलगा

एकुलता एक मुलगा असा मारहाणीत मृत्यू मुखी पडल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तो वडगाव येथे एका कंपनीत नोकरीस होता. दरम्यान, घटनेचे गांभीर्य पाहता फलटणचे पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक तुषार दोशी, उपअधीक्षक विशाल खांबे, पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कीर्ती म्हस्के करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.