माढा ः येथील बैठकीप्रसंगी प्रतिमापूजन करताना संत शिरोमणी सावता महाराजांचे १९ वे वंशज सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, प्रकाश गोरे, दत्तात्रय देवकर, दिगंबर माळी, आबासाहेब खारे, आजिनाथ माळी, अमर हजारे आदी.
माढ्यातील समाजबांधव नायगावला जाणार
सावित्रीमाई फुले यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याची उत्सुकता
माढा, ता. २८ : ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारीला नायगाव (जि. सातारा) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यास माढा तालुक्यातील हजारो समाज बांधव जाणार आहेत.
याबाबत माढा तालुका सकल माळी समाजाने माढ्यातील तुळजाभवानी मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या स्मारकामुळे माळी समाज बांधवांसह सर्व बहुजन समाज बांधवांमधून आनंद व्यक्त होत आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीस संत शिरोमणी सावता महाराजांचे १९ वे वंशज सावता महाराज वसेकर, ट्रस्टचे सचिव प्रभू महाराज माळी, ज्येष्ठ नेते प्रकाश गोरे, दत्तात्रय देवकर, दिगंबर माळी, आबासाहेब खारे, आजिनाथ माळी, अमर हजारे, रामहरी वहील, सिद्धेश्वर घुगे, हरिभाऊ देवकर, उल्हास राऊत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण राऊत यांनी केले.