चिंचवड, ता.२८ ः तेलंगणातील मेहबूबनगर येथे होणाऱ्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी वेदांत संदीप कानपिळे याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
या यशाबद्दल पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन वेदांतचा गौरव करण्यात आला. यावेळी राजू कोतवाल, दिलीपसिंह मोहिते, डॉ. मृदुला महाजन उपस्थित होते. क्रीडा शिक्षिका पार्वती बाकळे व ऐश्वर्या साठे यांनी मार्गदर्शन केले. जयेश राठोर व ज्योती राठोर यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.